प्रियकराच्या मदतीनं पत्नीने काढला पतीचा काटा; हत्येच्या १० वर्षांनी पोलिसांनी केलं पत्नीला जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 05:22 PM2021-07-20T17:22:14+5:302021-07-20T17:23:42+5:30
प्रियकरासोबत मिळून शंकुतलानं २०११ मध्ये तिचा पती रवीची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी महिलेचा प्रियकर कमलची २०१८ मध्ये अटक झाली होती.
नवी दिल्ली – २०११ मध्ये पतीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी महिलेला क्राईम ब्रांचनं अटक केली आहे. आरोपी महिला राजस्थानच्या अलवर येथे जाऊन लपली होती. तिच्यावर ५० हजार रुपये बक्षीस होतं. कापसहेडा ठाण्यात या प्रकरणाची नोंद आहे. या आरोपी महिलेचं नाव शंकुतला आहे. २८ वर्षीय शंकुतलाला अलवर येथून अटक करण्यात आली आहे.
प्रियकरासोबत मिळून शंकुतलानं २०११ मध्ये तिचा पती रवीची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी महिलेचा प्रियकर कमलची २०१८ मध्ये अटक झाली होती. तर आरोपी महिला अलवर इथं लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी सापळा रचून तिला अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, २०११ मध्ये आरोपी महिला १८ वर्षाची असताना तिच्या इच्छेविरोधात २२ वर्षीय रवी कुमारसोबत तिचं लग्न लावलं होतं. तेव्हा मुलीचं कमलसोबत अफेअर सुरू होतं. त्यामुळेच या दोघांनी मिळून रवीची हत्या केली. हत्या केल्यानंतर रवीचा मृतदेह जमिनीत पुरून ठेवला. काही दिवसांनी हा मृतदेह काढून त्याचे अवशेष फेकून देण्यात आले. अलवर इथं शकुंतलाचा प्रियकर कमल याचं बिझनेस आहे.
हत्येच्या एक वर्षानंतर महिला प्रियकरासोबत राजस्थानमध्ये राहत होती. २०१७ मध्ये दोघांनी लग्न केले परंतु पोलिसांचा तपास सुरूच होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर २०१९ मध्ये राजस्थान इथं जाऊन प्रियकर कमलला अटक केली मात्र शकुंतला पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाली. अखेर १० वर्षानंतर पोलिसांनी सापळा रचून शकुंतलाला अटक केली. ही महिला अलवरला परतली होती. तेव्हा पोलिसांनी तिला अटक केली. सध्या हे दोघंही पोलीस रिमांडमध्ये आहेत.
चौकशीत समोर आलं की, पती रवीला कमल आणि शकुंतलाच्या अफेअरबद्दल माहिती झालं होतं. त्यानंतर रवीनं शकुंतलाला घरातून बाहेर पडणं आणि फोन करणं यावर निर्बंध घातले. त्यामुळे कमलसोबत मिळून पत्नीने प्रियकराचा काटा काढण्याचा प्लॅन बनवला. २२ मार्च २०११ रोजी शकुंतलाने पती रवीला तिच्या बहिणीकडे घेऊन जाण्यास सांगितले. रस्त्यात कमल वाट पाहत होता. या दोघांनी वाटेतच रवीला गळा दाबून हत्या केली. त्यानंतर या दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावून फरार झाले.