"माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करून महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:49 PM2021-09-06T20:49:58+5:302021-09-06T20:53:19+5:30
Crime News: ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे.
लखनौ - ''माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा’’, अशी फेसबुकवरून मुख्यमंत्र्यांना विनंती करून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशमधील हरदोई जिल्ह्यात घडली आहे. या महिलेने एका प्रकरणात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती करत एक पोस्ट लिहिली. तसेच काही छायाचित्रेही शेअर केली. त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Woman commits suicide after the request to Chief Minister Yogi Adityanath)
रोली गुप्ता उर्फ प्राची मनोज कुमार असे या मृत महिलेचे नाव आहे. तिने लवी गुप्ता या व्यक्तीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याच्याविरोधातील एफआयआरची कॉपी, लवी त्रिवेदीच्या मारहाणीमुळे रक्तबंबाळ झालेले कपडे शेअर केले आहेत. दरम्यान, ही पोस्ट टाकल्यानंतर तिने रात्री उशिरा घरातील एका खोलीत स्वत:ला कोंडून घेत गळफास घेऊन आत्महत्या केली.
रोली गुप्ताने आपल्या फेसबुक पोस्टमधून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती केली. त्यात तिने सांगितले की, शनिवारी संध्याकाळी लवी त्रिवेदी आणि त्याच्या कुटुंबीयांनी येऊन माझ्यासोबत आणि माझ्या मुलासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मलालाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच नाकाचा चावा घेतला. मारहाण करून माझ्याकडील लॉकेट, कानातील दागिने, माझे दोन अँड्रॉईड फोन आणि ९० हजारांची रोख रक्कम आपल्यासोबत घेऊन गेले. लवी त्रिवेदी आणि त्याच्या वडिलांनी मला खूप मारहाण केली. तसेच त्याच्या आईनेही माझे केस ओरबाडले. माझ्या मुलालाही खूप मारहाण केली. तसेच माझ्याविरोधात काही बोलल्यास संपूर्ण कुटुंबाला गोळ्या घालून ठार मारू, अशी धमकी दिली. यापूर्वी मी त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये खूप वेळा तक्रार केली होती. मात्र त्यावर काहीही कारवाई झालेली नाही, आता माझ्या कुटुंबाला काही झाल्यास त्याची जबाबदारी केवळ सरकारची असेल, सर कृपया माझी मदत करा, माझ्यासोबत न्याय करा असे तिने या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले होते. दरम्यान, या पोस्टनंतर रोली गुप्ता हिने स्वत:ला तुरुंगात बंद करून घेत गळफास घेतला.
रोली गुप्ता हिने पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. पोलिसांना एक सांगितले तर ते एफआयआरमध्ये दुसरेच काहीतरी लिहिलात, असा आरोप तिने केला होता. दरम्यान, या प्रकरणी तपास सुरू आहे. तपासाचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी लवी त्रिवेदी याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.