हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतनसह तिघांना जन्मठेप; दिंडोशी न्यायालयाचा निर्णय, २५ हजार रुपयांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 03:04 PM2023-10-11T15:04:48+5:302023-10-11T15:05:10+5:30

दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन उपाध्यायसह आरोपी विजय कुमार राजभर, प्रदीप कुमार राजभर, तसेच शिवकुमार राजभर या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला.

Hema Upadhyay murder case; Life imprisonment for three including Chintan; Dindoshi court decision, fine of Rs. 25 thousand | हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतनसह तिघांना जन्मठेप; दिंडोशी न्यायालयाचा निर्णय, २५ हजार रुपयांचा दंड

हेमा उपाध्याय हत्या प्रकरण; चिंतनसह तिघांना जन्मठेप; दिंडोशी न्यायालयाचा निर्णय, २५ हजार रुपयांचा दंड

मुंबई : छायाचित्रकार-शिल्पकार हेमा उपाध्याय आणि वकील हरेश भंबानींच्या दुहेरी हत्येचा कट रचल्याबद्दल दोषी ठरलेला आरोपी चिंतन उपाध्याय व त्याच्या साथीदारांना दिलासा देण्यास न्यायालयाने नकार दिला. दिंडोशी सत्र न्यायालयाने चिंतन उपाध्यायसह आरोपी विजय कुमार राजभर, प्रदीप कुमार राजभर, तसेच शिवकुमार राजभर या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली, तसेच २५ हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने ठोठावला.

चित्रकार, छायाचित्रकार आणि शिल्पकार म्हणून जगदविख्यात असलेल्या हेमा उपाध्याय (वय ४२) आणि त्यांचे वकील हरीश भंबानी (६५) यांचे मृतदेह कांदिवली येथील एका नाल्यात २०१५ साली आढळून आले. कचरा गोळा करणाऱ्या कामगाराला नाल्यात दोन खोक्यांमध्ये हे मृतदेह सापडले. पती चिंतन उपाध्याय यांनी मारेकऱ्यांना सुपारी देऊन हेमा उपाध्याय यांची हत्या केल्याचे पुरावे पोलिसांनी सादर करून २२ डिसेंबर २०१५ रोजी त्याला अटक केली.

 गुन्ह्यातील पुरावे नष्ट
- या दुहेरी हत्या प्रकरणातील अन्य आरोपी शिवकुमार राजभर, प्रदीप कुमार राजभर आणि विजय कुमार राजभर या तिघांनाही हत्या, हत्येचा कट रचणे आणि गुन्हा केल्याचे  पुरावे नष्ट करण्याचा आरोपांखाली दोषी ठरविण्यात आले.
- दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.वाय.भोसले यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. 
- राज्य सरकारने सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी न्यायालयाला केली होती. तर आरोपींनी त्याला विरोध करीत दयेची मागणी केली.

Web Title: Hema Upadhyay murder case; Life imprisonment for three including Chintan; Dindoshi court decision, fine of Rs. 25 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.