हेमंत करकरेंनी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला; आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांचा खळबळजनक आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 08:47 PM2019-08-01T20:47:43+5:302019-08-01T20:50:23+5:30
आम्हाला त्यांच्या प्रति आदर आहे.
भोपाळ - हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंग यांचा छळ केला. त्यांनी अशा प्रकारे लोकांचा छळ करून चूक केली असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) नेते इंद्रेश कुमार यांनी केला आहे. तसेच प्रज्ञा सिंह यांनी करेकरेंबद्दल केलेले वक्तव्य मागे घेतले हा त्यांचा मोठेपणा असल्याचे देखील कुमार यांनी पुढे स्पष्ट केले आहे. हेमंत करकरे हे २६/११ च्या मुंबईतील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहिद झाले. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रति आदर आहे. त्यावेळी काँग्रेसने या संस्थांचा गैरवापर करत एका महिलेचा छळ केला. ‘भगवा दहशतवाद’च्या नावाखाली हा कट रचण्यात आला होता.
Indresh Kumar, RSS, in Bhopal: Hemant Karkare (former Maharashtra ATS chief) died of terrorist's bullets, so he is a martyr & deserves respect. However, then Congress Govt misused agencies & tortured a woman(Bhopal MP Pragya Thakur) under conspiracy of 'bhagwa aatankwad'. (31.07) pic.twitter.com/2MMsFAgRTC
— ANI (@ANI) July 31, 2019
Indresh Kumar, RSS: Hemant Karkare acted wrongly by torturing others. Still, Pragya exhibited humanity by amending her statement (on Karkare) after there was uproar over her remarks https://t.co/sCslZlxoCe
— ANI (@ANI) July 31, 2019