CPUमध्ये ठेवले होते ड्रग्ज लपवून; NCB ने तरुणाला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 08:58 PM2021-03-24T20:58:49+5:302021-03-24T21:01:42+5:30

NCB Arrested College student : अनेक बॉलिवूड कलाकारांसह मुंबई उपनगर परिसरातील काही लोकांना तो ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

Hiding drugs that were kept in the CPU; NCB arrests college going youth | CPUमध्ये ठेवले होते ड्रग्ज लपवून; NCB ने तरुणाला केली अटक 

CPUमध्ये ठेवले होते ड्रग्ज लपवून; NCB ने तरुणाला केली अटक 

Next
ठळक मुद्देNCB ला ही माहिती मिळताच, NCB च्या पथकाने रात्री उशिरा याठिकाणी पोहोचली. या तरुणाने आपल्या घरामध्ये दोन कुत्रेही पाळलेले होते.

NCB ने वांद्रे परिसरात छापेमारी करत एका १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून ड्रग्ज आणि २ लाख ३० हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आरोपीचं नाव अयान सिन्हा असं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या कॉलेजमध्ये होणाऱ्या तरुणाने संगणकाच्या CPUमध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते. मुंबईच्या वांद्रे, खार आणि अंधेरी या परसिरात तो अमली पदार्थांचा पुरवठा करायचा. अनेक बॉलिवूड कलाकारांसह मुंबई उपनगर परिसरातील काही लोकांना तो ड्रग्जचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर येत आहे. 

NCB ला ही माहिती मिळताच, NCB च्या पथकाने रात्री उशिरा याठिकाणी पोहोचली. या तरुणाने आपल्या घरामध्ये दोन कुत्रेही पाळलेले होते. एनसीबीचे पथक घरात जाताच हे कुत्रे त्यांच्या अंगावर धावून येऊ लागले. मात्र एनसीबीने आपली कारवाई सुरुच ठेवली. एनसीबीने आरोपीचा मोबाईल फोन, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि ड्रग्ज मोजण्याची मशीन जप्त केली आहे. हा तरुण ड्रग्ज विकण्यासाठी फेक फेसबुक अकाऊंटचा वापर करत होता. तसेच ऑनलाईन पद्धतीनं याचं पेमेंट केलं जायचं. न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला ४ दिवस NCB कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

आरोपीने ड्रग्ज पुरवण्याचं काम लॉकडाऊनच्या काळात सुरू केलं आणि यातून भरपूर पैसेही कमावले. आरोपी अयानला ताब्यात घेतल्यानंतर एनसीबीने मंगळवारी संध्याकाळी वांद्र्यातील अनेक ठिकाणी छापेमारी केली. अटक करण्यात आल्यानंतर अयान सिन्हाने  चौकशीदरम्यान अनेक कलाकारांची नावे घेतली आहेत, ज्यांना तो ड्रग्ज पुरवठा करत होता. 

Web Title: Hiding drugs that were kept in the CPU; NCB arrests college going youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.