भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 04:25 PM2020-01-05T16:25:18+5:302020-01-05T16:27:03+5:30
भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
बस्ती - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात प्रवेश केल्याच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर भारत - नेपाळच्या सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बस्ती क्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांन सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. त्यामुळे भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगरसह नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांत पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढवला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी भारत - नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातून नेपाळमध्ये पळून जाऊ शकतात. त्यांच्या शोधार्थ संपूर्ण गोरखपूर झोनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशात आयएसचे दोन संशयित दहशतवादी घुसले; भारत - नेपाळ सीमेवर हायअलर्ट https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 5, 2020
दहशतवादी शेवटचे सिलिगुडीमध्ये दिसले होते
हे दोन दहशतवाद्यांना पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे शेवटचे दिसले होते. हे दोघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशात दाखल झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Ashutosh Kumar, IG, Basti Range: Two wanted terrorists have entered the state of UP and there is information that they may attempt to flee to Nepal. Therefore, alert has been issued along India-Nepal border in Siddharthnagar district. pic.twitter.com/Qp7YJ4eZDC
— ANI UP (@ANINewsUP) January 5, 2020