हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 03:40 PM2021-08-09T15:40:22+5:302021-08-09T16:01:09+5:30

Tiffin bomb filled with RDX found : पोलिसांना हा टिफिन बॉम्ब पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अमृतसरच्या डालेके  गावाजवळ सापडला आहे.

High alert! Tiffin bomb filled with RDX found in Amritsar border area | हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब 

हायअलर्ट! अमृतसर सीमा परिसरात सापडला RDXने भरलेला टिफिन बॉम्ब 

Next
ठळक मुद्देबीएसएफ आणि पंजाब पोलीस कर्मचारी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.अमृतसरच्या सीमा भागात ड्रोनद्वारे दोन किलो आरडीएक्सने भरलेला टिफिन बॉम्ब पाकिस्तानकडून फेकण्यात आला.डालेके गावाजवळ बॉम्ब सापडला, बीएएसएफ आणि पंजाब पोलीस संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. 

अमृतसर/चंदीगड - पाकिस्तानने पुन्हा सीमेवर घृणास्पद कृत्य केले आहे. १५ ऑगस्ट रोजी पंजाबमध्ये दहशत माजवण्याचा कट होता. अमृतसरच्या सीमा भागात ड्रोनद्वारे दोन किलो आरडीएक्सने भरलेला टिफिन बॉम्ब पाकिस्तानकडून फेकण्यात आला. या बॉम्बने पंजाबमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोठा स्फोट घडवण्याचा कट रचला गेला होता. मात्र, पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे. पोलिसांना हा टिफिन बॉम्ब पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अमृतसरच्या डालेके  गावाजवळ सापडला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पंजाब पोलिसांकडून दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेमुळे लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीएसएफ आणि पंजाब पोलीस कर्मचारी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी स्वातंत्र्यदिनी पंजाबमध्ये मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

डालेके गावाजवळ बॉम्ब सापडला, बीएएसएफ आणि पंजाब पोलीस संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवत आहेत.  बॉम्ब ड्रोनद्वारे सीमेपलीकडून फेकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांनी चंदीगडमध्ये सांगितले की, त्यात दोन किलो आरडीएक्स आणि स्विच यंत्रणा असलेला टाइम बॉम्ब आहे. यात स्प्रिंग मेकॅनिझम, मॅग्नेटिक आणि 3 डेटोनेटर देखील मिळाले आहेत. अशी शक्यता आहे की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटना काही मोठ्या दहशतवादी घटना घडवण्याच्या तयारीत होत्या.

आरडीएक्स आणि टिफिन बॉम्ब मिळाल्यानंतर गावातील लोकांत भीती निर्माण झाली आहे. जर ड्रोनमधून खाली टाकताना हा बॉम्ब इथे फुटला असता तर डझनभर लोकांना आपला जीव गमवावा लागला असता. सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री भारत-पाक सीमेवर ड्रोनचा आवाज ऐकू आला. गावातील लोकांनी तत्काळ पोलिस आणि बीएसएफ अधिकाऱ्यांना कळवले. शनिवारी रात्रीच, बीएसएफचे जवान आणि पोलिसांनी या भागात शोधमोहीम सुरू केली. रविवारी रात्री उशिरा, येथून २ किलोहून अधिक आरडीएक्स, ५ ग्रेनेड आणि १०० पेक्षा जास्त गोळ्या जप्त करण्यात आल्या.

Web Title: High alert! Tiffin bomb filled with RDX found in Amritsar border area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.