सेक्सच्या बदल्यात कॉलेजमधले प्रोफेसर देत होते चांगले मार्क, अशी उघड झाली हायप्रोफाईल केस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 07:03 PM2022-01-17T19:03:16+5:302022-01-17T19:04:24+5:30
Sex Crime : हसन युनिव्हर्सिटीशी संबंधित ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाले. यानंतर देशभरात खळबळ उडाली.
राबत : चांगल्या गुणांच्या बदल्यात विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या प्राध्यापकाची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. या हायप्रोफाईल प्रकरणात अजून ४ प्राध्यापकांनान्यायालयात हजर राहायचं आहे. आफ्रिकन देशातील मोरोक्को येथील न्यायालयाने एका प्राध्यापकाला असभ्य वर्तन, लैंगिक छळ आणि हिंसाचार याप्रकरणी दोषी ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हसन युनिव्हर्सिटीशी संबंधित ही बाब तेव्हा समोर आली जेव्हा विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाले. यानंतर देशभरात खळबळ उडाली.
५ प्राध्यापकांची नावे झाली उघड
बीबीसीच्या अहवालानुसार, मोरोक्कोमधील विद्यापीठांमध्ये हाय प्रोफाइल लैंगिक छळाच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा हा पहिला निर्णय आहे. हसन I विद्यापीठाच्या (Hassan I University) अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाला आपल्या विद्यार्थ्यांच्या लैंगिक छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. प्राध्यापक विद्यार्थिनींना चांगले गुण देण्याच्या बहाण्याने लैंगिक त्रास देत असे. या प्रकरणी अजून ४ प्राध्यापक न्यायालयात हजर राहिले आहेत. चांगल्या गुणांच्या बदल्यात मुलींना शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप विद्यापीठातील एकूण पाच प्राध्यापकांवर आहे.
मुलीने चॅट लीक केले होते
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यातील चॅट सोशल मीडियावर लीक झाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. वास्तविक, विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने हे चॅट सार्वजनिक केले होते. हळूहळू हे प्रकरण पसरले आणि हे चॅट विद्यापीठ प्रशासनापर्यंत पोहोचले. यानंतर प्राध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले. या खुलाशानंतर देशभरात खळबळ उडाली असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत.
मोरोक्कन विद्यापीठाची वाईट प्रतिमा
दरम्यान, अन्य काही विद्यार्थिनींनीही असाच आरोप केल्यावर विद्यापीठातील इतर प्राध्यापकांचीही नावे समोर आली आहेत. एकूण पाच प्राध्यापकांना आरोपी करून पाचही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी आता एकाला असभ्य वर्तन, लैंगिक छळ आणि हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. अहवालानुसार, अलिकडच्या वर्षांत मोरोक्कन विद्यापीठाच्या प्रतिष्ठेवर परिणाम होईल अशा घटना एकामागून एक घडत आहेत. तथापि, सध्याचे प्रकरण वेगळे होते कारण ते प्रथमच न्यायालयात गेले.