किहीममधील रेव्ह पार्टी, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर धाड; दोन बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 09:20 PM2019-06-28T21:20:13+5:302019-06-28T21:27:48+5:30
रायगड गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई, २६ ग्रॅम कोकेन केले जप्त
आविष्कार देसाई
अलिबाग - तालुक्यातील किहीम आणि कनकेश्र्वर फाटा येथील फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीसह हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर रायगड पोलिसांनी छापा टाकून २१ जणांना अटक केली. त्यामध्ये दोन बॉलीवूडमधील सिनेतारकांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनैतीक व्यापार प्रतिबंधक आणि एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात पिडीत मुलींची सुटका केली, तर १४ आरोपींची ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
अलिबाग जवळीलच कनकेश्वर फाटा येथील सक्सेना फार्म आणि किहीम येथील चिराणीका फार्मवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टी आणि वेश्या व्यवसायावर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. हा सापळा पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून रचला होता. छापा टाकला तेव्हा पार्टी चांगलीच रंगात आली होती. त्यामध्ये बहुतांश जणांनी मद्य सेवनाबरोबरच अमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आला. राखी नोटानी हिच्याकडे १५ ग्रॅम, तर रंजीता सिंग उर्फ रेणू हिच्याकडे ११ ग्रॅम कोकेन हा आमली पदार्थ सापडला. त्यानंतर पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात पिडीत मुलींची कर्जत येथील महिला सुधारगृहात तर १४ आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. आरोपी हे सर्व हाय प्रोफाईल कॅटेगरीतील असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यातील काही उद्योगजगतातील तर काही बॉलीवूडशी संबंधीत आहेत. दरम्यान, काहीच महिन्यापूर्वी रायगड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतरची हि सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.
Maharashtra: Raigad Police busted a prostitution racket today.Cocaine also recovered.7 victims rescued&9 accused including 5 females-Rekha Notani, Ranjita Singh, Seema Singh, Shruti Gaonkar & Aarohi Singh arrested. Victims sent to correction home. Case filed under NDPS&PITA Acts.
— ANI (@ANI) June 28, 2019