फसवणुकीचा अनोखा खेळ! या 'नटवरलाल'ने 730 दिवसांत 910 लोकांना केले ब्लॅकमेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 01:05 PM2022-03-30T13:05:57+5:302022-03-30T13:08:17+5:30

Crime News : वकिलाने 2 वर्षात देशातील 910 लोकांना ब्लॅकमेल केले. यापैकी 467 पीडितांनी केंद्राच्या नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. तेलंगणामध्ये 78 गुन्हे दाखल झाले आहेत.

high tech natwarlal blackmailed 910 people across the india within 2 years sextortion | फसवणुकीचा अनोखा खेळ! या 'नटवरलाल'ने 730 दिवसांत 910 लोकांना केले ब्लॅकमेल

फसवणुकीचा अनोखा खेळ! या 'नटवरलाल'ने 730 दिवसांत 910 लोकांना केले ब्लॅकमेल

Next

दुर्ग : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एका आधुनिक 'नटवरलाल'ला पकडले आहे. सायबर सेल आणि दुर्ग पोलिसांनी सेक्सटॉर्शन टोळीचा मास्टरमाइंड वकील अहमद याला 14 मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर आणि गुन्ह्यांच्या नोंदी तपासल्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. या वकिलाचा भारतातील मोस्ट वाँटेड गुन्हेगारांच्या यादीत समावेश आहे. तो हरियाणातील मेवात भागात राहून सेक्सटॉर्शनची शाळा चालवत होता. यासंबंधीचे वृत्त झी न्यूज हिंदी या वेबसाइटने दिले आहे. 

2 वर्षात देशातील 910 लोकांना केले ब्लॅकमेल
वकिलाने 2 वर्षात देशातील 910 लोकांना ब्लॅकमेल केले. यापैकी 467 पीडितांनी केंद्राच्या नॅशनल सायबर क्राइम पोर्टलवर तक्रार केली. तेलंगणामध्ये 78 गुन्हे दाखल झाले आहेत. छत्तीसगडमध्ये दुर्गसह आणखी दोन जिल्ह्यात या टोळीवर गुन्हे दाखल आहेत. केवळ 83 प्रकरणांमध्ये एफआयआर आहेत. दुर्गमध्येही 40 तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणी टोळ्या वृद्धांनाच टार्गेट करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

धमकावून 3 कोटींहून अधिक रक्कम वसूल 
मिळालेल्या माहितीनुसार, 2 वर्षांत 910 लोक सेक्सटॉर्शनचे बळी ठरले आणि त्यांना धमकावून 3 कोटींहून अधिक रक्कम वसूल करण्यात आली. सायबर पोर्टलवर 467 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, दुर्गमध्ये 1 हून अधिक तक्रारी झाल्या आहेत.

सेक्सटॉर्शनच्या नावाखाली 35 हजार रुपयांची मागणी
एका रेल्वे कर्मचाऱ्याने 10 दिवसांपूर्वी पोलिसांशी संपर्क साधला होता. सेक्सटॉर्शनच्या नावाखाली 35 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली मैत्री झाली. यानंतर नग्न व्हिडिओ पाठवून त्याचे अश्लील कृत्य त्याच्या मोबाईल स्क्रीनवर रेकॉर्ड करून कैद केले. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी पैशांची मागणी करत होता.

फोटो व्हायरल करण्याची धमकी 
सोमवारीच एका नगरसेवकाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपी सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून पैशांची मागणी करत आहे. यावर पोलिसांनी प्रथम आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. यानंतर नगरसेवकाचे सोशल मीडिया खाते निष्क्रिय करण्यात आले. एकदा पैसे ट्रान्सफर केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी त्यांना ब्लॅकमेल करत पैशांची मागणी करतात.

अनेक राज्यातील 910 जणांची फसवणूक
एएसपी संजय ध्रुव यांनी सांगितले की, सायबर सेल आणि बोरी पोलिसांच्या पथकाने पकडलेला आरोपी मोस्ट वॉण्टेड आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सायबर सेल आणि बोरी पोलिसांमार्फत तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या टोळीने मिळून अनेक राज्यातील 910 जणांची फसवणूक केली आहे. या टोळीवर आतापर्यंत 83 गुन्हे दाखल आहेत.
 

Web Title: high tech natwarlal blackmailed 910 people across the india within 2 years sextortion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.