लॅपटॉप चोरणारी 'ती' उच्च शिक्षित महिला अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 09:34 PM2021-11-17T21:34:02+5:302021-11-17T21:34:28+5:30
Laptop Robber Lady Arrested : ही महिला उच्चशिक्षित असून तीने घोडबंदर भागातील दोन दुकानात चोरी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तिच्याकडून २ लाख ६५ हजार ३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ठाणे : कापुरबावडी घोडबंदर रोड भागात असलेल्या एका शॉपमध्ये महिला काही सामान विकत घेण्यासाठी गेली होती. परंतु तेथील स्टाफची नजर चुकवूत त्या अनोळखी महिलेने शॉपमधील ९९ हजारांचा लॅपटॉप घेऊन पोबारा केल्याची घटना ३ नोव्हेंबर रोजी घडली होती. त्यानंतर या प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन त्या महिलेला अटक केली आहे. ही महिला उच्चशिक्षित असून तीने घोडबंदर भागातील दोन दुकानात चोरी केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. तिच्याकडून २ लाख ६५ हजार ३३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेली महिला ही मुलुंड येथे वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच तिच्या बोलण्यावरुन ती चोरी करीत असेल असे दिसून येत नव्हते. त्यामुळे याचाच फायदा घेऊन तिने अशा प्रकारच्या चोऱ्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. घोडबंदर येथील कापूरबावडी भागात एक मॉल आहे. ३ नोव्हेंबरला रात्री ८ वाजताच्या सुमारास दिवाळीच्या खरेदी निमित्ताने मॉलमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा घेत मॉलमधून सुमारे एक लाख रु पयांचा लॅपटॉप चोरीस गेला होता. या घटनेनंतर मॉलच्या व्यवस्थापकांनी १५ नोव्हेंबरला याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे, कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मॉलमध्ये सुरक्षा रक्षक तसेच यंत्नणा असतानाही चोरीचा प्रकार घडल्याने पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त केला जात होते. दरम्यान, पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्नीकरण तपासणी केली. त्यावेळी एक महिला हा लॅपटॉप दुकानाबाहेर घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. मात्र, या महिलेने चेहऱ्यावर मास्क लावला असल्याने तिचा तपास पोलिसांना करणो कठीण जात होते.
दरम्यान, कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निंबाळकर, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पिपंळे, पोलीस उपनिरीक्षक मोरे, हवालदार खोडे, पोलीस नाईक निखील जाधव यांच्या पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, तपास केला असता. महिला ही मुलुंड येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला राहत्या घरातून ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली असता महिलेने गुन्ह्याची कबूली दिली. तिला अटक करण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.