हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 03:35 PM2019-04-02T15:35:56+5:302019-04-02T15:36:26+5:30

सहाय्यक अभियंता एस.एफ. कलकुटे याला काल आझाद मैदान पोलिसांनी अटक केली.

Himalaya bridge accident: Police detained by Mumbai police engineer till April 5 | हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

हिमालय पूल दुर्घटना : अटक मुंबई पालिकेच्या अभियंत्याला ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

googlenewsNext

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई महापालिकेचा सहाय्यक अभियंता एस.एफ. कलकुटे याला काल आझाद मैदान पोलिसांनीअटक केली. कलकुटेला आज न्यायालयात हजर केले असता ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

१४ मार्च रोजी गर्दीच्यावेळी सीएसएमटी येथील हिमालय पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा ठार व अनेक जण जखमी झाले होते. या घटनेनंतर रेल्वे व महापालिकेच्या बेजबाबदार कार्यपद्धतीबद्दल टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटर नीराजकुमार देसाईला याआधी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 



 

Web Title: Himalaya bridge accident: Police detained by Mumbai police engineer till April 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.