Hindustani Bhau: 'हिंदुस्तानी भाऊ' उर्फ विकास फाटकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 09:53 PM2022-02-05T21:53:03+5:302022-02-05T21:53:31+5:30

विकास फाटकच्या जामिन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार.

Hindustani Bhau alias Vikas fhatak remanded in judicial custody for 14 days bandra court offline examinationa | Hindustani Bhau: 'हिंदुस्तानी भाऊ' उर्फ विकास फाटकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

Hindustani Bhau: 'हिंदुस्तानी भाऊ' उर्फ विकास फाटकला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

googlenewsNext

दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास फाटकला अटक केली होती. दरम्यान, त्यानंतर शनिवारी त्याला वांद्रे येथील दंडाधिकारी न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

विकास फाटकचे वकील महेश मुळे यांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती दिली. तसंच यावर सोमवारी सुनावणी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


नेमकं काय घडलं होतं?
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या आंदोलनाच्या स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती. मात्र याबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले होते. 

Web Title: Hindustani Bhau alias Vikas fhatak remanded in judicial custody for 14 days bandra court offline examinationa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.