जामिनासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कोयता, बिअरच्या बाटलीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 04:01 PM2019-09-30T16:01:06+5:302019-09-30T16:02:13+5:30

वाकड येथील प्रकार : चौघांविरोधात गुन्हा दाखल..

hit by weapon and beer bottle for refusing to pay bail | जामिनासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कोयता, बिअरच्या बाटलीने मारहाण

जामिनासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कोयता, बिअरच्या बाटलीने मारहाण

Next

पिंपरी : भाऊ जेलमध्ये असून त्याच्या जामिनासाठी ३० हजार रुपये दे, अशी मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी कोयता व बिअरच्या बाटलीने तसेच हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथील गणेशनगर येथे मोकळ्या मैदानात शनिवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सतीश साहेबराव सावंत (वय ३०, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गंग्या उर्फ रोहन वासू वाघमारे (वय २५, रा. वाकड), किरण संभाजी तनपुरे (वय २३), नण्या ढवळे (वय २५, दोघेही रा. गणेशनगर) व आरोपी गंग्या याचा एक २० वर्षीय मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फियार्दी सावंत शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर घराशेजारील पानटपरीवर आले असता आरोपी त्यांना मोकळ्या  मैदानात घेऊन गेले. किरणचा भाऊ विकास तनपुरे हा जेलमध्ये आहे. त्याचा जामीन करायचा आहे. त्यासाठी तू ३० हजार रुपये दे, असे सांगितले असता फियार्दी सावंत यांनी नकार दिला. त्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फियार्दी सावंत यांना शिवीगाळ करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोयता व बिअरच्या बाटलीने व हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांच्या हात, पाय व डोक्यातून रक्क वाहू लागले. उद्या पैसे देतो, असे फियार्दी सावंत यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींनी त्यांना सोडून दिले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: hit by weapon and beer bottle for refusing to pay bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.