एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 04:01 PM2024-05-21T16:01:33+5:302024-05-21T16:03:40+5:30
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी या महिलेच्या ग्राहकांना एक एक करून फोन करण्यास सुरुवात केली आहे
जगात अशा लोकांची कमी नाही जे पैशांसाठी दुसऱ्याला नुकसान पोहचवण्यापासून त्यांना संपवण्यापर्यंत मागे हटत नाहीत. अमेरिकेच्या ओहियो इथे असेच प्रकरण समोर आले आहे. याठिकाणी HIV पीडित एका ३० वर्षीय सेक्स वर्करनं सर्वकाही माहिती असतानाही जाणुनबुजून २११ ग्राहकांशी संबंध बनवले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
द न्यूयॉर्क पोस्टनुसार, १ जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत २ वर्षात विविध राज्यातील २११ ग्राहकांसोबत या महिलेने लैंगिक संबंध बनवले. या महिलेला ती आधीपासून HIV ग्रस्त असल्याची आणि आपल्या कामामधून आणखी बरेच जण संक्रमित होतील याची माहिती होती. या महिलेनं बहुतांश ग्राहकांना पश्चिम वर्जिनियाच्या ओहियो येथील एका छोट्या शहरात बोलावलं होते. हे प्रकरण समोर येताच मोठी खळबळ माजली आहे.
प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी या महिलेच्या ग्राहकांना एक एक करून फोन करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी हे कॉल केले जात आहेत. त्यात कुणालाही घाबरवण्याचा हेतू नाही असं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. १३ मे रोजी या महिलेनं एका ग्राहकाला सेक्ससाठी ऑफर करण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळी ही महिला गेल्या २ वर्षापासून एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचं समोर आले. त्यानंतर राज्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी खबरदारी घेत या महिलेच्या संपर्कात आलेल्या २११ जणांना एचआयव्ही चाचणी करण्याची सूचना केली आहे.
HIV आजार काय आहे?
HIV म्हणजे Human Immunodeficiency Virus हा एक प्रकारचा असा व्हायरस आहे जो शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. विशेषत: टी पेशींना लक्ष्य करतो. या पेशी शरीरातील संक्रमण आणि आजाराशी लढण्यासाठी मदत करतात. जेव्हा HIV रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो तेव्हा शरीर कुठल्याही आजाराशी किंवा संक्रमणाशी लढण्यात अपयशी ठरते. एचआयव्ही संक्रमण वाढत गेल्यास त्याचे एक्वायर्ड इम्यूनो डिफिशिएंसी सिंड्रोम म्हणजे एड्स होऊ शकतो. रक्त, वीर्य, योनी, स्तन यामाध्यमातून एचआयव्ही पसरतो. एचआयव्हीपासून १०० टक्के बचाव होऊ शकतो. त्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्यासाठी कायम कंडोमचा वापर करावा. कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याने वापरलेली सुई अथवा ब्लेडचा वापर करू नये. गर्भवस्था काळात नियमित तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करावे.