सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी म्हणून लागले होर्डिंग्ज, फोटो व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 20:09 IST2020-07-27T20:03:52+5:302020-07-27T20:09:03+5:30

सीबीआय चौकशीच्या मागणीशी संबंधित विषय सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत राहतो. आता एक नवीन चित्र व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत एक होर्डिंग दिसत आहे.

Hoardings set up for CBI probe into Sushant Singh Rajput suicide case, photo goes viral | सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी म्हणून लागले होर्डिंग्ज, फोटो व्हायरल 

सुशांत सिंग राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी म्हणून लागले होर्डिंग्ज, फोटो व्हायरल 

ठळक मुद्देही पोस्टर्स दिल्लीच्या रस्त्यावर लावल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. विशेष म्हणजे दिल बेचराच्या रिलीजनंतर हे चित्र व्हायरल होऊ लागले आहे.सुशांत सिंह राजपूतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालंय की, त्याच्या आत्मह्त्येबाबत कुठल्याही प्रकारचा संशय नाही.

नवी दिल्ली - सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सुशांत याने आत्महत्या करून आता दीड महिन्याहून अधिक काळ झाला आहे. पण चाहत्यांचा रोष शांत होण्याचे नाव घेत नाही. ते सतत सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. सीबीआय चौकशीच्या मागणीशी संबंधित विषय सोशल मीडियावर सतत ट्रेंड होत राहतो. आता एक नवीन चित्र व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोत एक होर्डिंग दिसत आहे.

वास्तविक, एका चाहत्याने रस्त्यावर होर्डिंग्ज लावले असल्याचे व्हायरल चित्रात दिसून आले आहे. या होर्डिंगच्या माध्यमातून सुशांत सिंग राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली आहे. या होर्डिंग्जमध्ये रवी तिवारी यांचे नाव लिहिलेले आहे. ही पोस्टर्स दिल्लीच्या रस्त्यावर लावल्याचा दावाही सोशल मीडियावर केला जात आहे. विशेष म्हणजे दिल बेचराच्या रिलीजनंतर हे चित्र व्हायरल होऊ लागले आहे.



सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याची मागणी सुरुवातीपासूनच होत आहे. या प्रकरणात केवळ चाहतेच नव्हे तर अनेक सेलेब्रिटीही सक्रिय आहेत. कंगना राणौत सातत्याने सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. त्याचबरोबर अभिनेता शेखर सुमन यांनीही याबाबत पत्रकार परिषद घेतली आहे. आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामीही या विषयावर सक्रीय झाले आहेत. त्यांनी सीबीआय चौकशीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. पीएमओनेही या पत्राची दखल घेतली आहे. या प्रकरणात मुंबई पोलीस सातत्याने तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांना मिळाला व्हिसेरा रिपोर्ट

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या मृत्यूनंतर जवळपास दीड महिन्यानंतर आता पोलिसांजवळ त्याचा व्हिसेरा रिपोर्ट आलेला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या व्हिसेरा रिपोर्टमध्ये हे स्पष्ट झालंय की, त्याच्या आत्मह्त्येबाबत कुठल्याही प्रकारचा संशय नाही.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियाच्या मदतीने सुरु होती देहविक्री

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

 

बापरे! केरळ, कर्नाटकात ISIS चे दहशतवादी मोठ्या संख्येने, संयुक्त राष्ट्राच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड  

 

धक्कादायक! नवजात बाळाला दूध पाजले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

 

संतापजनक! रायगड हादरलं, अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन नराधमाने केली हत्या

 

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये; तगादा लावल्याने विवाहितेची आत्महत्या

Web Title: Hoardings set up for CBI probe into Sushant Singh Rajput suicide case, photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.