बिहारमध्ये खेळली गेली रक्तरंजीत होळी; एका दिवसात 20 हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 08:13 PM2020-03-11T20:13:00+5:302020-03-11T20:15:32+5:30
बेगूसराय शहरातील लोहिया नगरमध्ये मजुरांची सायकल दुचाकीवर धडकल्याने दुचाकीस्वाराने मजुरांना मारहाण करून हत्या केली.
बिहार - यंदा बिहारमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले असून रक्ताने माखलेली होळी साजरी झाली. होळीच्यादिवशी बिहारमध्ये जवळपास २० जणांची हत्या करण्यात आली. या सर्व हत्या होळीच्या दिवशीच घडल्या. यात जेडीयूच्या विद्यार्थी नेत्यासह 2 व्यवसायिकाची हाती करण्यात आली आहे. बर्याच खुनाच्या घटना पाटणा आणि नालंदा येथे घडल्या आहेत.
पाटण्यातील होळीच्या रात्री जेडीयूचे विद्यार्थी नेते कन्हैया कौशिक यांची हत्या करण्यात आली. पाटणा येथील पटेल नगर परिसरात युवा छात्र नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. जेडीयू विद्यार्थी नेत्याच्या हत्येच्या घटनेत एक व्यक्तीही जखमी झाला आहे. विद्यार्थी नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. दुसरीकडे, पाटणा जिल्ह्यातील गोपालपूर पोलीस स्टेशन, बख्तियारपूर आणि बाढ पोलीस स्टेशन भागात एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बख्तियारपूरच्या लक्ष्मणपूर येथे विटांनी हल्ला करुन एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. फक्त पाटणा जिल्ह्यात पाच हत्या झाल्या आहेत.
नवादा येथे एका भावाने आपल्या पत्नीला रंग लावल्याने मोठ्या भावाची हत्या केली. नवादाच्या वारिसलीगंजमधील या घटनेमुळे गावातील गावकरी हैराण झाले आहेत. भागलपूरमध्ये डीजे वाजविण्याच्या वादातून एका तरूणाला ठार मारण्यात आले होते आणि सीवानमध्ये एका सेवानिवृत्त कामगाराला गुन्हेगारांनी गोळ्या घालून ठार मारले. बेगूसरायमध्ये साहेबपूर कमल पोलीस स्टेशनच्या हद्दीत सबदलपूर गावात बटाटे खरेदीच्या वादातून गुन्हेगारांनी तीन जणांना गोळ्या घातल्या. ज्यामध्ये एकजण ठार तर दोनजण गंभीर जखमी असल्याचे समजत आहे.
बेगूसराय शहरातील लोहिया नगरमध्ये मजुरांची सायकल दुचाकीवर धडकल्याने दुचाकीस्वाराने मजुरांना मारहाण करून हत्या केली. गोपालगंज येथे दुचाकीस्वाराला दुसऱ्या दुचाकीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार युवकाची बेदम मारहाण करून हाती करण्यात आली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. मुंगेरमधील एक जावई कित्येक दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना, जावई सापडला नाही तेव्हा सासऱ्याला गोळ्या घातल्या आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. नालंदामध्ये गेल्या २४ तासांत ४ लोक बेपत्ता झाले आहेत. पहिल्या घटनेत नगरनौसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी राजेश यादव नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली. दीपनगर पोलीस स्टेशन परिसरातील महेश मिस्त्री आणि गोखुलपूर ओपी पोलीस स्टेशन भागात नीरज कुमार यांना ठार मारण्यात आले, तर बेना पोलीस स्टेशन परिसरातील चैनपुरा येथे मंटू कुमार यांना गुन्हेगारांनी मारहाण केली. आरा येथील होळीच्या रात्री उशिरा एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करून जखमी केले, त्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तसेच कटिहार आणि समस्तीपूर येथे दोन व्यावसायिकाची हत्या करुन गुन्हेगार पळून गेले. कटिहारच्या मनसाहीमध्ये गुन्हेगारांनी किराणा व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समस्तीपूरमधील विभूतीपुरात गुन्हेगारांनी दुसऱ्या देखील व्यावसायिकाला गोळ्या घातल्या. सीतामढीमध्ये जमावबंदी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. व्यापाऱ्यांना लुटून मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वार गुन्हेगारांना ग्रामस्थांनी घेराव घातला. एक गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला.