बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 05:27 PM2022-06-01T17:27:39+5:302022-06-01T17:31:41+5:30

Crime News : या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता.

Home delivery of the bomb was taking place, police busted racket; One handcuffs | बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

Next

कोलकाता : खाद्यपदार्थ आणि इतर वस्तूंची ऑनलाईन डिलिव्हरी (Online delivery)  झालेली तुम्ही ऐकली असेल, पण बॉम्बची होम डिलिव्हरीही होते, असं क्वचितच ऐकलं असेल. मात्र, आता बंगालमध्ये बॉम्ब खरेदी-विक्रीच्या ऑनलाईन व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश (Police Busted)  केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली असून मकबूल शेख असे त्याचे नाव आहे. या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. करार निश्चित झाल्यावर बॉम्ब ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यात आले. पेमेंटही ऑनलाईन करण्यात झाले.

काटव्यातून अवैध धंदे सुरू होते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शौचालयाच्या छतावरून अनेक बॉम्बही सापडले आहेत. ही घटना पूर्व वर्धमान जिल्ह्यातील कटवा भागातील आहे, जिथून त्याला अटक करण्यात आली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. कटवा येथूनच हा अवैध धंदा चालवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या टोळीत आणखी कोण-कोण सामील आहेत, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशय, पतीने नातेवाईकाची केली हत्या 

प्रियकराने प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावले, बलात्कारानंतर हत्या करून झाडाला लटकवला मृतदेह

बॉम्बच्या होम डिलिव्हरीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली
बॉम्बच्या ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या या धंद्याचा बहुधा पहिल्यांदाच पर्दाफाश केल्यानंतर पोलिसांचेही धाबे दणाणले आहेत. याआधीही राज्यात ठिकठिकाणी बॉम्ब आणि शस्त्रे सापडली आहेत, त्यामुळे ममता बॅनर्जी सरकारही विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष भाजपने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी सरकारला घेरले आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल सिन्हा यांनी टोला लगावत राज्य सरकारद्वारे कार्यक्रम चालवत असल्याचे म्हटले आहे. दारात शिधापाठोपाठ आता बंगालमध्येही बॉम्ब पोचू लागले आहेत.

बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील बोगटूई येथे झालेल्या हत्याकांडाच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना (डीजीपी) बेकायदेशीर बॉम्ब आणि बंदुक जप्त करण्यासाठी देशव्यापी शोध मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते. तेव्हापासून पोलीस सातत्याने मोहीम राबवत आहेत.

 

 

Web Title: Home delivery of the bomb was taking place, police busted racket; One handcuffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.