पोलीस ठाण्यातच आढळला होमगार्डचा संशयास्पद मृतदेह; सगळे प्रशासकीय अधिकारी हादरले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 06:57 PM2021-09-06T18:57:02+5:302021-09-06T19:02:51+5:30

या घटनेची पुष्टी डीसीपींनी केली आहे. विशेष म्हणजे रविवारीच पूर्व दिल्लीत एका हवालदाराने सर्व्हिस पिस्तुलमधून हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण केली होती.

Home guard body found hanging inside Delhi Pandavnagar police station | पोलीस ठाण्यातच आढळला होमगार्डचा संशयास्पद मृतदेह; सगळे प्रशासकीय अधिकारी हादरले

पोलीस ठाण्यातच आढळला होमगार्डचा संशयास्पद मृतदेह; सगळे प्रशासकीय अधिकारी हादरले

Next
ठळक मुद्देपांडव नगर पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. बृज लाल उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे राहणारा आहे. ते होमगार्डच्या सेवेतून निवृत्त झाले होते.प्रथम दर्शनी मृत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पोस्टमोर्टम रिपोर्टमधूनच मृत्यूचं कारण समोर येईल.

नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्ली पोलीस ठाण्यात लटकलेल्या मृतदेहामुळे मोठी खळबळ माजली आहे. पोलीस स्टेशनमध्ये मृतदेह मिळण्याची सूचना मिळताच जिल्ह्यातील बहुतांश वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचलं. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यात आली आहे. सध्या प्रथम दर्शनी या व्यक्तीने आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पोस्टमोर्टमनंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल.

या घटनेची पुष्टी डीसीपींनी केली आहे. विशेष म्हणजे रविवारीच पूर्व दिल्लीत एका हवालदाराने सर्व्हिस पिस्तुलमधून हवेत गोळीबार करुन दहशत निर्माण केली होती. आता पांडव नगरच्या पोलीस ठाण्यात हा मृतदेह आढळला. याबाबत डीसीपी म्हणाले की, मृत व्यक्ती हा ४६ वर्षाचा असून त्याचं नाव बृज लाल असं आहे. बृज लाल उत्तर प्रदेशातील खुर्जा येथे राहणारा आहे. ते होमगार्डच्या सेवेतून निवृत्त झाले होते. पांडव नगर पोलीस ठाण्यात त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. बृज लालच्या कुटुंबात पत्नी आणि ४ मुलं आहे. होमगार्डचा संशयास्पद मृत्यू पोलीस ठाण्यातच झाल्यानं हे प्रकरण गंभीर आहे सध्या यावर कुणीही काहीही बोलायला तयार नाही.

प्रियकरासोबत युवती पळाली, हेडकॉन्स्टेबलनं पोलीस चौकीत आणून केला बलात्कार; जीवे मारण्याची धमकी

दरम्यान, सोमवारी दुपारी पूर्व दिल्लीचे जिल्हा डीसीपी प्रियंका कश्यप यांनी पोलीस ठाण्यात संशयास्पद अवस्थेत होमगार्डचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याची पुष्टी केली. डीसीपींनी दिलेल्या माहितीनुसार, हा मृतदेह पंचनामा झाल्यानंतर पोस्टमोर्टमसाठी पाठवला आहे. प्रथम दर्शनी मृत व्यक्तीने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. पोस्टमोर्टम रिपोर्टमधूनच मृत्यूचं कारण समोर येईल. आत्महत्येचं कारण काय आहे? घटनास्थळी कुठली सुसाईड नोट आढळली आहे का? या प्रश्नांची उत्तरं दिल्ली पोलिसांकडून अद्याप आली नाहीत.

शिपाईनं चालवली होती गोळी

विशेष म्हणजे, दिल्ली पोलीस दलात दोन दिवसांत दोन खळबळजनक घटना घडल्या. एकीकडे ठाण्यात मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला तर दुसरीकडे त्याच्या आदल्यादिवशी पूर्व दिल्लीच्या शकरपूर पोलीस ठाण्यातील हवालदार राजीव कुमार यांनी सर्व्हिस पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी या राजीव कुमार यांनी का गोळी चालवली यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही. आरोपी हवालदार शाहदरा जिल्ह्यातील बाजारात तैनात होता. या घटनेला २४ तास उलटत नाही तोवर पोलीस ठाण्यातच होमगार्ड जवानाचा मृतदेह आढळल्याने कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं केले जात आहे.

Web Title: Home guard body found hanging inside Delhi Pandavnagar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस