घाटकोपरमध्ये ११ फेब्रुवारीपासून होमगार्ड नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 10:05 PM2019-02-05T22:05:17+5:302019-02-05T22:06:15+5:30
दोघांना अनुक्रमे १६ ०० व ८०० मीटर धावावयाचे आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील उमेदवार भरतीसाठी उतरु शकतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुंबई - राज्य गृहरक्षक दलाच्यावतीने (होमगार्ड) ११ फेब्रुवारीपासून होमगार्ड सदस्यांच्या नोंदणीला प्रारंभ होणार आहे. घाटकोपर येथील रेल्वे आयुक्तालयाच्या आवारात १६ फेब्रुवारीपर्यंत ही सकाळी सात ते सांयकाळी पाच वाजेपर्यत मोहीम सुरु राहणार आहे. त्यासाठी इच्छुक युवक-युवतींना मोहीमेत सहभागी व्हावे, असे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
होमागार्डसाठी कमीत कमी दहावी पास असणे आवश्यक असून पुरुषासाठी १६२ सेटीमीटर व महिलांसाठी १५० सेमी उंची आवश्यक आहे. त्याशिवाय दोघांना अनुक्रमे १६ ०० व ८०० मीटर धावावयाचे आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील उमेदवार भरतीसाठी उतरु शकतात, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.