पाेलिसांना मिळालेले पुरस्कारच कर्तृत्व सिद्ध करतात, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली बाजू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 09:31 PM2020-08-24T21:31:09+5:302020-08-24T21:32:48+5:30
राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती.गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
रायगड - मुंबई पाेलिसांनी आजवर केलेल्या कामगीरीबद्दल त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाबद्दल हे पुरस्कारच बरेच काही सांगून जातात असे, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगून मुंबई पाेलिसांची बाजू मांडली.
राेहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीची हत्या करण्यात आली हाेती. गृहमंत्री देशमुख यांनी साेमवारी तांबडी येथे येऊन पिडीतेच्या कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्तेचा तपास मुंबई पाेलिसांकडून काढून ताे सीबीआयकडे साेपवण्याचे आदेश सर्वाेच्य न्यायालयाने दिले हाेते. या प्रकरणात प्रचंड वादंग माजला हाेता. मुंबई पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्न चिन्ह विविध माध्यमातून उभे करण्यात येत आहेत.
मुंबई पाेलिसांनी केलेल्या कामगिरी बद्दल विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना मिळालेले पुरस्कारच त्यांची कार्यक्षमता काय आहे हे सिध्द करतात. त्यामुळे आमच्या पोलिसांना त्यांची कार्यक्षमता सिद्ध करण्याची आवश्यकता नाही असे त्यांनी स्पष्ट करत मुंबई पाेलिसांची बाजू मांडली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?
सीबीआय तपासाची चक्रं जोरात फिरली, टीम सुशांत राजपूतच्या घरी या व्यक्तींसोबत पोहोचली!