मुख्यमंत्र्यांपूर्वी गृहमंत्र्यांना धमकी! दुबई आणि दिल्लीहून फोन, तक्रारीनंतर चौकशी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 09:05 PM2020-09-07T21:05:56+5:302020-09-07T21:06:40+5:30
वेगवेगळ्या नंबर वरून एकूण पाच वेळा फोन करून दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने अनिल देशमुख यांना संभाल के रहना, अशी धमकी दिली आहे.
नागपूर : मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मातोश्री बंगला उडवून देण्याच्या धमकीच्या फोन पूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबई आणि दिल्लीहून धमकीचे फोन आले. वेगवेगळ्या नंबर वरून एकूण पाच वेळा फोन करून दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने अनिल देशमुख यांना संभाल के रहना, अशी धमकी दिली आहे. या प्रकरणाची तक्रार नागपूर पोलिसांकडे करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी देणारा फोन रविवारी रात्री दुबईहून आल्याचे उघड झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. मात्र तत्पूर्वीच शनिवारी रात्री १० वाजून २४ मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दुबईहून चार वेळा फोन आले. हे चारही कॉल गृहमंत्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोठेकर यांनी उचलले. आरोपी कॉलरने आपण दुबईतून बोलत असल्याचे सांगून गृहमंत्री देशमुख यांना सांभाळून राहा, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर रविवारी दुपारी १.३४ वाजता गृहमंत्री देशमुख यांच्याशी सिव्हिल लाईन मधील बंगल्यावरच्या लँडलाईनवर फोन आला. कॉलरने आपले नाव संजयकुमार सिंग सांगितले आणि पुन्हा गृहमंत्री यांना धमकी दिली. देशमुख यांनी रविवारी रात्री पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना या धमकीच्या फोनची माहितीवजा तक्रार देण्यात आली. थेट गृहमंत्र्यांनाच फोन आल्यामुळे पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे. नमूद दोन्ही क्रमांक कुठले आहेत, त्याचा शोध घेतला जात आहे.
आता काही सांगणार नाही : पोलीस आयुक्त
यासंबंधाने अधिक माहिती मिळवण्यासाठी लोकमतने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती देण्याचे टाळले. आपण यावेळी या प्रकरणाच्या संबंधाने काहीही बोलू इच्छित नाही, असे ते म्हणाले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल
महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर
मोठी बातमी! अखेर रियाचा भाऊ शोविक आणि मिरांडाला एनसीबीने केली अटक
फ़ुटबॉलपटूविरोधात खळबळजनक आरोप, मुंबईतील तरुणीने केली बलात्काराचा तक्रार
मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन
वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!