होमगार्डने महिलेच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करून केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 09:53 PM2022-07-08T21:53:33+5:302022-07-08T21:54:12+5:30

Rape Case :  मित्राशी संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला

Homeguard made a video of the woman taking a bath, blackmailed and raped | होमगार्डने महिलेच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करून केला बलात्कार

होमगार्डने महिलेच्या आंघोळीचा व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करून केला बलात्कार

googlenewsNext

झाशी : एका महिलेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी होमगार्ड जवानाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करून कारागृहात पाठवले आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी होमगार्ड जवानाने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सतत ब्लॅकमेल करत होता. पीडितेने हा संपूर्ण प्रकार पतीला सांगितल्यावर तो पत्नीसह कोतवाली येथे पोहोचला, त्यानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, सिपरी बाजार येथील रहिवासी असलेली होमगार्ड तिच्या पतीशी मैत्री करत होता आणि नंतर तो घरी सतत येत होता. काही वेळापूर्वी आरोपी पतीच्या गैरहजेरीत पीडितेच्या घरी आला आणि चोरून त्याने तिचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला. हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिच्यावर बलात्कार करत राहिला. काही दिवसांपूर्वी आरोपी होमगार्डने पीडितेवर मित्रासोबत संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत अश्लील व्हिडिओ बनवला.

पीडितेच्या तक्रारीनुसार, जेव्हा त्याने तिला भेटायला बोलावले तेव्हा तिने आरोपीजवळ जाण्यास नकार दिला. तेव्हा तो व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागला. पीडितेच्या तक्रारीवरून शहर कोतवाली येथे कलम ३७६, ३५४, ५०४ व ५०६ अन्वये होमगार्ड व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी शिवहरी मीना यांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी होमगार्डला अटक करण्यात आली आहे.

 

Web Title: Homeguard made a video of the woman taking a bath, blackmailed and raped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.