चिमुकल्याचा नरबळी; सहा जणांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 08:39 AM2020-10-24T08:39:58+5:302020-10-24T08:40:32+5:30
पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी २०१७ रोजी शाळेतून झेंडावदंन करुन घरी आल्यानंतर अंगणात खेळत असताना गायब झाला होता.
उस्मानाबाद: कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील ६ वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून बळी देणाऱ्या आत्या चुलता-चुलतीसह ६ जणांना जिल्हा व सत्र न्या. एम. जी. देशपांडे यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी मयतांचे आत्मे भटकू नयेत, यासाठी अत्यंत निर्घृणपणे बालकाचा खून केला होता.
पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी २०१७ रोजी शाळेतून झेंडावदंन करुन घरी आल्यानंतर अंगणात खेळत असताना गायब झाला होता.
पोलीस तपासामध्ये कृष्णाची सख्खी आत्या द्रौपदी पौळ हिने त्याला घरामागील दाट झाडीत बांधून मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजा करुन बळी दिला. द्रौपदी पौळ, उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले, साहेबराव इंगोले, सुवर्णा भाडळे, राहूल चुडावकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.
अंधश्रद्धेतून घेतला जीव -
आरोपी उत्तम इंगोले याची चुलत बहीण व साहेबराव इंगोले याच्या मयत पत्नीचा आत्मा भटकू नये, तसेच आरोपी द्रौपदी पौळ हिच्या दोन मुलींच्या पतीचा मृत्यू झाला आहे. एका मुलीची लेकरे जगत नव्हती, यातून सुटका होण्यासाठी मांत्रिक राहूल चुडावकर व सुवर्णा भाडळे यांच्या सल्ल्याने बळी देण्यात आला.