पैशांच्या मोहापायी 'त्या' चौघांचा अनैतिक कृत्यात सहभाग; घराच्या जिन्यात लपून करायचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 08:19 AM2021-05-20T08:19:35+5:302021-05-20T08:20:16+5:30

नगरमधील हनीट्रॅप: याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले आणि सागर खरमाळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

Honey Trap: Involvement of money in 'immoral acts'; Filming to hide on the stairs of the house | पैशांच्या मोहापायी 'त्या' चौघांचा अनैतिक कृत्यात सहभाग; घराच्या जिन्यात लपून करायचे चित्रीकरण

पैशांच्या मोहापायी 'त्या' चौघांचा अनैतिक कृत्यात सहभाग; घराच्या जिन्यात लपून करायचे चित्रीकरण

Next

अहमदनगर : जखणगाव येथील हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर यातील आरोपींची अनैतिक कृत्ये समोर आली आहेत. पैशांचा हव्यास आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तरुणांना हेरून या महिलेने स्वत:ची एक टोळीच तयार केली होती. बंगल्यात आलेल्या पुरुषांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना दमदाटी व मारहाण करत पैसे उकळणे, अशी जबाबदारी या तरुणांवर होती.

याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले आणि सागर खरमाळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमोल मोरे याचे केडगाव चौकात किराणा दुकान असून तो आरोपी महिलेचा खास पंटर आहे. सचिन खेसे याचेही नगर तालुक्यातील हमीदपूर येथे किराणा दुकान आहे. महिलेच्या जाळ्यात अडकलेला क्लासवन अधिकारी हा हमीदपूर येथीलच आहे. हे चौघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. २६ एप्रिल रोजी या महिलेने व्यावसायिकाला घरी बोलविल्यानंतर त्याचे अमोल मोरे याने व्हिडिओ चित्रीकरण केले. एक मे रोजी अधिकाऱ्याला अडकविण्यात महेश बागले, सागर खरमाळे व सचिन खेसे यांचा सहभाग होता.  

व्हिडीओ मिळताच लूटमार
महिलेच्या बंगल्यात आलेल्या पुरुषाला सदर महिला शरीर संबंध करण्यास भाग पाडायची. यावेळी घरातील जिन्यात व बाथरूममध्ये लपून असलेले तिचे साथीदार अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करायचे. व्हिडिओ पूर्ण होताच त्या व्यक्तीवर हे तरुण हल्ला करून त्याच्याकडील पैसे व दागिने हिसकावून घ्यायचे.

चर्चा अनेकांची मात्र तक्रार नाही
महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांच्या नावाची चर्चा आहे. मात्र बदनामीच्या भीतीपोटी हे लोक पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरत आहेत. नगर शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तीही याच हनीट्रॅपची शिकार ठरल्याची चर्चा आहे. तक्रारदार समोर आल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. या टोळीने ज्यांना खंडणी मागितली आहे त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन या गुन्ह्याचे तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी केले आहे.

Web Title: Honey Trap: Involvement of money in 'immoral acts'; Filming to hide on the stairs of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.