नायजेरियात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत 20 शाळकरी मुलांचा मृत्यू
By हेमंत बावकर | Published: October 30, 2020 10:29 PM2020-10-30T22:29:46+5:302020-10-30T22:30:29+5:30
accident : ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या स्कूल बसवर जाऊन धडकला.
लागोस : नायजेरियामध्ये ट्रकने स्कूल बसला दिलेल्या जोरदार धडकेत आज 21 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 20 शाळकरी मुले असल्याचे सांगितले जात आहे. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला.
हा अपघात बुधवारी इनुगू प्रांतातील अवगूमध्ये झाला. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या स्कूल बसवर जाऊन धडकला. या बसमध्ये 61 शाळकरी मुले प्रवास करत होती. यापैकी 20 मुलांचा मृत्यू झाला. तर बरी मुले जखमी झाली आहेत. मृतांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे.
ही मुले कॅथोलिक डायोसिसद्वारे संचालित प्रेझेंटेशन नर्सरी आणि प्रायमरी स्कूलमध्ये शिकत होती. बुहारी यांनी वाहन मालकांना आणि चालकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे. प्राथमिक तपासानुसार ही दुर्घटना ट्रकचे ब्रेक फेल गेल्याने झाल्याचे समोर आले आहे.