संतापलेल्या डॉक्टरने पत्नीवर फेकला गरम चहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2018 07:06 PM2018-08-07T19:06:32+5:302018-08-07T19:09:36+5:30
ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर येथे घडली असून वर्तक नगर पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे
ठाणे - कार्यक्रमाला सोबत येऊ का? असे विचारल्याने संतापलेल्या डॉक्टर पतीने पत्नीवर गरम चहा फेकला आहे. ही धक्कादायक घटना ठाण्यातील वर्तकनगर येथे रविवारी घडली. पत्नीवर गरम चहा फेकल्याप्रकरणी ठाण्यामध्ये या डॉक्टरावरगुन्हा दाखल करण्यात आला आहे. गरम चहा अंगावर फेकल्याने पत्नी जखमी झाली आहे. या डॉक्टर पतीची पत्नीदेखील पालिकेच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.
या डॉक्टर पतीची पत्नीदेखील पालिकेच्या रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करते. या दाम्पत्याचे लग्न ११ वर्षांपूर्वी झाले असून, त्यांना २ मुले देखील आहेत. या पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत. दरम्यान, या घटनेच्या आधीच पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे पण तो न्यायालयात प्रलंबित आहे. याशिवाय तिने पतीविरोधात २०१६ मध्ये अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला आहे. पत्नीने केलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी पती चहा पीत असताना तिने एका कार्यक्रमाला सोबत येण्याबाबत पतीला विचारलं. त्यावर चिडलेल्या पतीने गरम चहाचा कप तिच्यावर ओतला. कलम ३३७ आणि ५०६ अंतर्गतही डॉक्टर पतीविरुद्ध वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.