पैशाच्या वादातून हॉटेलमालकाने केली नोकराची हत्या; गळ्यावर चाकूचे वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2022 01:58 PM2022-08-16T13:58:05+5:302022-08-16T13:58:22+5:30

आरोपीस ठोकल्या बेड्या

Hotel owner kills servant over money dispute; A stab wound to the neck in vardha | पैशाच्या वादातून हॉटेलमालकाने केली नोकराची हत्या; गळ्यावर चाकूचे वार

पैशाच्या वादातून हॉटेलमालकाने केली नोकराची हत्या; गळ्यावर चाकूचे वार

Next

- चैतन्य जोशी

वर्धा : पैशाच्या कारणातून झालेल्या वादात मद्यधुंद हॉटेलमालकाने नोकराला दुचाकीवर बसवून पिपरी मेघे परिसरातील जुना पाणी चौकातील उड्डाणपुलावर नेले. तेथे वाद करुन हॉटेलमधील नोकराच्या गळ्यावर आणि हातावर चाकूने सपासप वार करुन निघृ्ण हत्या केली. ही घटना 16 ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. अमोल मसराम (३२) रा. कारला चौक असे मृतकाचे नाव आहे. तर महेश मसराम उर्फ महेश मॅटर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी महेश मसराम उर्फ महेश मॅटर याचे बायपास रस्त्यावर असलेल्या कारला चाैकात एस.एम. बिर्याणी नामक हॉटेल आहे. याच हॉटेलमध्ये मृतक अमोल मसराम हा काम करीत होता. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी दोघांत पैशाच्या कारणातून वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपी महेश मसराम याने 15 ऑगस्ट रोजी अमोलला जीवे मारण्याचा कट रचला. रात्रीच्यासुमारास आरोपी महेश हॉटेलात गेला. तेथे त्याने दारु ढोसली.

मृतक अमोललाही दारु पाजली. त्यानंतर आरोपी महेश याने मृतक अमोलला दुचाकीवर बसवून बायपास रस्त्याने पिपरी मेघे येथील जुना पाणी परिसरातून जाणाऱ्या उड्डणपुलावर नेले. तेथे पुन्हा आरोपी महेश मॅटर याने मृतकाची वाद करुन जवळील चाकूने त्याच्या गळ्यावर पाठीवर तसेच हातापायावर सुमारे दहा ते बारावेळा सपासप वार करुन तेथून निघून गेला. अमोलचा मृतदेह उड्डणपुलावरच रक्ताच्या थारोळ्यात रात्रभर पडून राहिला. १६ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास नागरिकांना मृतदेह दिसून येताच त्यांनी तत्काळ रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. दरम्यान मृतकाच्या घरच्यांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृतकाचा मावस भाऊ आकाश चिंधूजी इरपाते याने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांनी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

आणखी आरोपी वाढण्याची शक्यता

आरोपी महेश मसराम उर्फ महेश मॅटर याने हॉटेलातीलच नोकराची हत्या केल्याचे उघडकीस आले. मृतकाला दुचाकीवर बसवून नेताना आरोपी महेशसोबत आणखी एक जण असल्याचा संशय रामनगर पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

वर्षभरापूर्वी ऑनलाईन मागविला होता चाकू

आरोपी महेश मॅटर याच्याविरुद्ध यापूर्वीही दारुचे तसेच आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी आरोपी महेश याने एका ऑनलाईन साईटवरुन चायनीज चाकू ऑर्डर केला होता. त्याच चाकूने महेश मॅटर याने अमोलची हत्या केल्याची माहिती आहे.

दुचाकीसह रक्ताने माखलेले कपडे जप्त

ज्या दुचाकीवर बसवून मृतकाला बायपास रस्त्याने आरोपी महेश घेऊन गेला होता. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच आरोपीचे रक्ताने माखाळलेले कपडेही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चाकूही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती आहे.

Web Title: Hotel owner kills servant over money dispute; A stab wound to the neck in vardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.