मरिन लाईन्सला महिलेसमोर हॉटेल कर्मचाऱ्याचे हस्तमैथुनाचा प्रयत्न; सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 03:06 PM2020-02-17T15:06:12+5:302020-02-17T19:05:46+5:30
अटक करण्यात आली अशी माहिती एल. टी. मार्ग पोलिसांनी दिली.
मुंबई - मरिन लाईन्स येथे महिलेसमोर अश्लील हावभाव करणाऱ्या हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याला शनिवारी एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. एका चायनीज हॉटेलमध्ये आरोपी नोकरीला आहे. महिलेसमोर हस्तमैथुन केल्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी महिला पारसी डेअरीच्या विरुद्ध दिशेला बसलेली असताना आरोपी महिलेजवळ जाऊन बसला. महिला तिच्या फोनवरुन बोलत असताना आरोपी तिच्याजवळ गेला. त्याचे अश्लील वर्तन पाहून महिलेने आरडाओरडा सुरु केल्यानंतर आरोपीने तिथून पळ काढला. महिलेने नंतर एल. टी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मरीन लाईन्सला जिथे ही घटना घडली, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यावरुन आरोपीची ओळख पटवण्यात आली. आरोपीला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर महिलेने त्याला ओळखले. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली अशी माहिती एल. टी. मार्ग पोलिसांनी दिली.
मुंबई - मरीन लाईन्स येथे महिलेसमोर हस्तमैथुनाचा प्रयत्न; विकृतास पोलिसांनी केली अटक https://t.co/CbvSFUB0GJ
— Lokmat (@MiLOKMAT) February 17, 2020
पोलिसांनी ज्या हॉटेलमध्ये आरोपी नोकरी करत होत्या त्या हॉटेलच्या मालकाला कर्मचाऱ्याविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती दिली आहे. त्याला लवकरच हॉटेलमधून काढून टाकण्यात येईल, अशी हमी हॉटेल मालकाने दिली. तक्रारदार महिला परदेशी दूतावासामध्ये नोकरीला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.