हॉटेल कामगाराची डोक्यात दगड टाकून हत्या; एक संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 PM2021-09-09T16:13:36+5:302021-09-09T16:15:25+5:30

ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रीट क्राइमसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकापाठोपाठ घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे.

Hotel worker killed by throwing stones at his head | हॉटेल कामगाराची डोक्यात दगड टाकून हत्या; एक संशयित अटकेत

हॉटेल कामगाराची डोक्यात दगड टाकून हत्या; एक संशयित अटकेत

googlenewsNext
ठळक मुद्देमध्यरात्री घडला भांडीबाजारात प्रकार

नाशिक : शहर व परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात येत नसून अंबड येथे झालेल्या तरुणाच्या खुनाला आठवडा उलटत नाही, तोच पुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडीबाजार परिसरातील बालाजी कोट येथे एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात दगड टाकून मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. ९) पहाटे उघडकीस आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवक गस्तीवरील पोलीस पथकाला आढळून येताच तत्काळ घटनास्थळी पोलिसांचा लवाजमा दाखल झाला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी एका संशयिताला अवघ्या दोन तासांत अटक केली आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत स्ट्रीट क्राइमसह खून, खुनाचा प्रयत्न, हाणामाऱ्यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकापाठोपाठ घडू लागल्याने कायदा-सुव्यवस्था धोक्यात सापडली आहे. बालाजी कोट परिसरात गुरुवारी मध्यरात्री सरकारवाडा पोलीस ठाण्याचे गस्ती पथक गस्तीदरम्यान बालाजी कोट मंदिर परिसरातून जात असताना रक्तबंबाळ मृतावस्थेत त्यांना एक पुरुष आढळला. सहायक उपनिरीक्षक राजेंद्र कदम तत्काळ घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. अवघ्या काही मिनिटांत सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जाधव, पंचवटीचे डॉ. सीताराम कोल्हे यांच्यासह गुन्हे शाखांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सरकारवाडा, पंचवटी, भद्रकाली अशा तीनही पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांनी तत्काळ या खुनामागील संशयितांच्या शोधासाठी तपासचक्रे फिरवून शहर व परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी भांडीबाजारातील हॉटेल राजहंसमधील कामगाराचा मृतदेह असल्याची माहिती समोर आल्यानंतर हॉटेलमालक रमेश निकम यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटविली असता अनिल गायधनी (५०) असे त्याचे नाव असल्याचे समोर आले. दरम्यान, दोन तासांत पोलिसांनी या खून प्रकरणात संशयित शुभम महेश मोरे (२२, रा. सराफबाजार) यास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अधारे ताब्यात घेतले असून, त्याचे काही साथीदारदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Hotel worker killed by throwing stones at his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.