पोलिसांना गुंगारा देणारी घरफोड्या करणारी टोळी गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 08:02 PM2018-07-11T20:02:42+5:302018-07-11T21:03:41+5:30

२२ घरफोड्यांचे गुन्हे उघड 

housebreaking gang bursted | पोलिसांना गुंगारा देणारी घरफोड्या करणारी टोळी गजाआड

पोलिसांना गुंगारा देणारी घरफोड्या करणारी टोळी गजाआड

googlenewsNext

जयंत धुळप

रायगड - राहण्याची ठिकाणे सातत्याने बदलून, पोलिसांना सतत गुंगारा देत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत घरफोड्या करून सोन्याचे दागिने आणि अन्य मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या  सहा आरोपींच्या टोळीला मोठय़ा शिताफीने गजाआड करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. रायगड जिल्ह्यात या टोळीने केलेल्या 22 घरफोडीच्या गुन्ह्यामधील 12 लाख 89 हजार 4०० रुपये किमतीचे सोन्याचे दागीने आणि चार मोबाईल, नऊ मोटरसायकल असा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, माणगांव उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जे.ए,शेख हे उपस्थित होते.

खबरीची माहिती, नाकाबंदी आणि सहा आरोपी अटक

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड,माणगांव आणि रोहा तालुक्यांत गेल्या काही महिन्यांपासून घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या पाश्र्वभूमीवर घरफोडीच्या या गुन्ह्याचा तपास करण्याकरिता विशेष नियोजन करण्यात आले होते. पोलीसांच्या खबरींना विश्वासात घेवून त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात पोलीस तपास वाढवून, नाकाबंदी करुन पाळत ठेवून या सहा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले असल्याचे पारसकर यांनी पुढे सांगितले.

रायगड आणि रत्नागीरी जिल्हयात गुन्हे केल्याची कबूली

अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची चौकशी करताना, त्यांनी रायगड जिल्ह्यात गोरेगांव,माणगांव, महाड शहर, महाड तालुका, महाड एमआयडीसी, रोहा आणि पेण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत एकुण 11 घरफोडय़ा आणि 9 मोटरसायकल व चार मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्यात देखील गुन्हे केले असून त्यांपैकी दोन गुन्ह्याची कबूली देखील त्यांनी दिली असल्याचे पारसकर यांनी दिली.

संघटीत गुन्हे केल्याने माेक्का कायद्यान्वये कारवाईचा प्रस्ताव

अटक करण्यात आलेले सहा आरोपी सातत्याने आपल्या राहाण्याची ठिकाणो बदलून या घरफोडय़ा संघटीतपणो करित असत. त्यांच्यावर रायगड व रत्नागीरी जिल्ह्यात या पूर्वी देखील गुन्हे दाखल झालेले आहेत. हे सहा आरोपीं संघटीतरित्या गुन्हे करित असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव आम्ही पाठविणार असल्याचे पारसकर यांनी अखेरीस सांगीतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरिक्षक जे.ए.शेख, सहा.पोलीस निरिक्षक आर.एस.सस्ते, सहा.पोलीस निरिक्षक आर.बी.पवार,पोलीस उप निरिक्षक ए.के.वळसंग आणि त्यांच्या पथकाने मुद्देमाल परत मिळविले असल्याचे अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील यांनी सांगितले. 


 

Web Title: housebreaking gang bursted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.