बाळ बोठेने कसा रचला कट, का केली हत्या? आवाजाचे नमुने घेणार; पोलीस कोठडीत रवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:19 AM2021-03-15T07:19:45+5:302021-03-15T07:20:09+5:30

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे ...

How to conspired Bal Bothe Will take sound samples | बाळ बोठेने कसा रचला कट, का केली हत्या? आवाजाचे नमुने घेणार; पोलीस कोठडीत रवानगी 

बाळ बोठेने कसा रचला कट, का केली हत्या? आवाजाचे नमुने घेणार; पोलीस कोठडीत रवानगी 

Next


अहमदनगर: सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. 

पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बोठे याला अटक केली. रविवारी त्याला पारनेर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले होते. सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. सिद्धार्थ बागले यांनी युक्तिवाद केला. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट का रचला, हा कट कुठे रचला, मारण्याचे नेमके कारण काय, सुपारी देण्यासाठी पैसे कसे उभे केले. तसेच गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींव्यतिरिक्त बोठे याला कुणी मदत केली,  हत्याकांड घडल्यानंतर बोठे हा १ डिसेंबरपासून फरार होता. या काळात तो कोठे गेला होता. त्याला कुणी आश्रय दिला होता, त्याला कुणी आर्थिक मदत केली आदींची विचारपूस करावयाची असून, त्याच्या आवाजाचे नमुने घ्यायचे आहेत. त्यामुळे आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी बागले यांनी केली. न्यायालयाने बोठे याला सात दिवसांची कोठडी दिली आहे. बोठेला हैदराबादला मदत करणारे आरोपी जर्नादन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अंजय चकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्यासह नगर येथून अटक केलेला महेश वसंत तनपुरे यांना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. 

बोठेच्या खिशात सापडली सुसाईड नोट 
- पोलिसांनी बोठे याला हैदराबाद येथील बिलालनगर परिसरातील हॉटेलमधून अटक केली तेव्हा झडती घेतली. त्याच्या खिशात एक पानाची सुसाईड नोट आढळून आली. 
- ‘माझा कोणत्याही प्रकारे अथवा माझा नैसर्गिक मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबीयांना संपर्क करावा’, असा उल्लेख या नोटमध्ये असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले.

Web Title: How to conspired Bal Bothe Will take sound samples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.