मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2023 10:27 AM2023-06-08T10:27:20+5:302023-06-09T14:18:53+5:30

मीरा रोड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.

How did the idea of dismembering a corpse come about? Shocking disclosure of the accused in the Mira Road murder case | मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा

मृतदेहाचे तुकडे करण्याची कल्पना कशी सुचली?; मीरा रोड हत्या प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक खुलासा

googlenewsNext

मुंबईतील मीरा रोड येथील एका सोसायटीतून महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेच्या मृतदेहाचे कटरने अनेक तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे तपासात उघड झाले. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 

प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला घातले; मीरा रोडमध्ये थरकाप उडवणारी घटना 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी तिच्या शरीराचे तुकडे करुन ते शिजवून कुत्र्याला खायला घालायचा. तसेच ते तुकडे रोज मिक्सरमध्ये बारीकही करायचा, असा खुलासा या आरोपीने केला आहे. ही कल्पना दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडमधून सूचल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली. सरस्वतीची हत्या करून पुरावे नष्ट करायचे असल्याने तिच्या शरीराचे असंख्य तुकडे साहनी याने कटरने केले. 

काही महिन्यापूर्वी दिल्लीत श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपीनेही तिच्या मृतदेहाचे तुकडे कटरने केले होते. श्रद्धा वालकर आणि आफताब हे दोघेही दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. काल मीरा रोड परिसरातील हत्याकांडात आरोपी साहनी आणि मृत सरस्वती हेही लिव्ह-रिलेशनशीपमध्ये राहत होते. 

सदनिकेतून दुर्गंधी अन् संशयास्पद हालचाली

भाईंदर पूर्वेला उड्डाणपुलाखाली शिधावाटप कार्यालयासमोर गीतानगर फेज ७ आहे. येथील गीता आकाश दीप इमारतीत ७०४ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये मनोज साहनी (५६) व सरस्वती वैद्य (३२) हे दोघे तीन वर्षांपासून भाड्याने राहत होते. या सदनिकेतून दुर्गंधी येऊ लागल्याने तसेच संशयास्पद हालचालींमुळे रहिवाशांनी बुधवारी रात्री नयानगर पोलिसांना कळवले. वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी लिफ्टमधून पळून चाललेल्या सहानी याला पकडले. फ्लॅटचा दरवाजा उघडला असता मानवी शरीराचे असंख्य तुकडे दिसले. 

पोलिस उपायुक्त जयंत बजबळे हेही घटनास्थळी हाेते. सहानी याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ४ जूनला साहनी याने सरस्वतीची हत्या करून तिचे कटरने तुकडे केले. तिचा मृतदेह नष्ट करण्यासाठी त्याने काही तुकडे शिजवून ते भटक्या कुत्र्यांना खायला घातल्याचे सांगितले जात आहे. पोलिस त्याबाबत चौकशी करत आहेत. त्याने कोणत्या कारणाने व कशा प्रकारे हत्या केली? याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी सांगितले.

Web Title: How did the idea of dismembering a corpse come about? Shocking disclosure of the accused in the Mira Road murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.