लाचखोर महिला तहसीलदाराची मालमत्ता किती? झाडाझडती सुरू; मीनल दळवींना आज कोर्टात हजर करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 10:58 AM2022-11-14T10:58:32+5:302022-11-14T10:59:24+5:30

Tehsildar Meenal Dalvi: बक्षीसपात्र भूखंडावर नाव चढवून देण्यासाठी खासगी एजंटामार्फत दोन लाखांची लाच  घेताना  सापडलेल्या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत.

How much is the property of a bribe-taking female tehsildar? Deforestation begins; Meenal Dalvi will present in court today | लाचखोर महिला तहसीलदाराची मालमत्ता किती? झाडाझडती सुरू; मीनल दळवींना आज कोर्टात हजर करणार

लाचखोर महिला तहसीलदाराची मालमत्ता किती? झाडाझडती सुरू; मीनल दळवींना आज कोर्टात हजर करणार

googlenewsNext

अलिबाग : बक्षीसपात्र भूखंडावर नाव चढवून देण्यासाठी खासगी एजंटामार्फत दोन लाखांची लाच  घेताना  सापडलेल्या अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढण्याच्या शक्यता आहेत. त्यांच्या घरझडतीतून कोट्यवधींचा ऐवज मिळाला असताना त्यांची स्थावर व जंगम मालमत्ताही त्याहून अधिक असल्याचे स्पष्ट होत आहे. 

त्यांचे व  जवळच्या नातेवाइकांचे विविध बँकांतील खाते आणि मालमत्तेसंबंधी कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, दळवी व एजंट राकेश चव्हाण यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने सोमवारी कोर्टात हजर केले जाणार आहे. त्यांच्या अलिबाग येथील घराची झडती घेतली असताना ६० तोळ्यांचे सोन्याचे दागिने व रोख २८ हजार रुपये आढळून आले होते. त्यांच्या मुंबईतील विक्रोळी येथील फ्लॅटचीही तपासणी केली असता त्या ठिकाणी एक कोटीची रोकड मिळाली होती. तसेच किमती ऐवज, वाहने विविध बँकांची खाती, खासगी वित्तीय संस्था व कंपन्यांतील ठेवीची प्रमाणपत्रे मिळाली असून, मालमत्तेसंबंधी कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत.

अलिबागमधील एका व्यावसायिकाला बक्षीसपात्र जमीन मिळाली असताना त्यावर त्याच्या भावाने आक्षेप घेतला. त्याबाबत तहसीलदार दळवी यांच्याकडे सुनावणी सुरू असताना आक्षेप फेटाळून लावण्यासाठी  दळवी यांनी मध्यस्थामार्फत पाच लाखांची मागणी केली होती. अखेर दोन लाखांवर तडजोड झाली.  मात्र  त्याबाबत व्यावसायिकाच्या जावयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार  एसीबीच्या  नवी मुंबईतील पथकाने शुक्रवारी सापळा रचून रक्कम स्वीकारणारा एजंट चव्हाण व  तहसीलदार मीनल  दळवी यांना अटक केली. 

शनिवार, रविवार बँकांना सुटी असल्याने खात्यांच्या तपशिलाची माहिती  मिळू शकली  नाही. सोमवारी त्याबाबत संबंधित बँकांकडे विचारणा करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून  सांगण्यात  आले. दळवी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत कोट्यवधींची मालमत्ता जमवली असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

कोठडी वाढवून मागणार
दोघांच्या पोलीस कोठडीची मुदत संपली असल्याने दळवी यांना सोमवारी अलिबाग येथील न्यायालयात  हजर करण्यात येणार आहे. चौकशी पूर्ण न झाल्याने त्यांच्या कोठडीची मुदत वाढवून घेण्यात  येईल, असे  तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: How much is the property of a bribe-taking female tehsildar? Deforestation begins; Meenal Dalvi will present in court today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.