भिवंडीत सापडला मानवी सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 02:41 IST2019-12-11T02:41:05+5:302019-12-11T02:41:16+5:30
वाळिसंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात मानवी सांगाडा सापडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.

भिवंडीत सापडला मानवी सांगाडा
भिवंडी : वाळिसंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात मानवी सांगाडा सापडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.
राजीव बीडलान (२५, रा. बेतुरकरपाडा, कल्याण) याचा हा सांगाडा असून, तो २१ आॅक्टोबर रोजी बेपत्ता झाल्याची नोंद २३ आॅक्टोबर रोजी कल्याणच्या पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचा खून करून मृतदेह भिवंडीत फेकून दिला.