खाकीतली माणुसकी! भरपावसात खांद्यावर उचलून नागरिकांना पोलिसांनी दिला मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 03:46 PM2019-09-04T15:46:05+5:302019-09-04T15:47:39+5:30

ऊन, पावसात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पोलिसांनी आज मुसळधार पावसातही खाकीतली माणुसकी दाखवली आहे. 

Humanity in khaki! Police had Helping citizens lift their shoulders in water logging places due to heavy rain | खाकीतली माणुसकी! भरपावसात खांद्यावर उचलून नागरिकांना पोलिसांनी दिला मदतीचा हात

खाकीतली माणुसकी! भरपावसात खांद्यावर उचलून नागरिकांना पोलिसांनी दिला मदतीचा हात

Next
ठळक मुद्देअतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. मनोज शर्मा आणि झोन ९ चे पोलीस उपायुक्त दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे मदतकार्य केले.  अंधेरी येथील डी. एन. नगर परिसरात देखील पाणी साचल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती.अडकलेल्या नागरिकांना पोलिसांनी मदतीचा हात देत त्यांना खांद्यावर उचलून सुरक्षित ठिकाणी पोचवले.

मुंबई - आज सकाळपासून मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावसाने झोडपले असून ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबले आहे. आज जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी तुंबलेल्या पाण्यात गाड्या, बसेस ठप्प झाल्या आहेत. अंधेरी येथील डी. एन. नगर परिसरात देखील पाणी साचल्याने प्रवाश्यांची तारांबळ उडाली होती. ऊन, पावसात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या पोलिसांनी आज मुसळधार पावसातही खाकीतली माणुसकी दाखवली आहे. 

कमरेपर्यंत पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या आणि अडकलेल्या नागरिकांना पोलिसांनी मदतीचा हात देत त्यांना खांद्यावर उचलून सुरक्षित ठिकाणी पोचवले. तसेच शाळेची बसमधील चिमुकल्या मुलांना देखील पाण्यात उतरू न देता पोलिसांनी लहानग्यांना उचलून घेऊन सुरक्षितस्थळी हलविले. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. मनोज शर्मा आणि झोन ९ चे पोलीस उपायुक्त दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हे मदतकार्य केले. 

Web Title: Humanity in khaki! Police had Helping citizens lift their shoulders in water logging places due to heavy rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.