‘नासा’च्या नावाने शेकडो लोकांना ६ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 11:07 AM2023-02-02T11:07:59+5:302023-02-02T11:08:30+5:30

Fraud : अमेरिकेतील अंतराळ संशोधन ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राइस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल

Hundreds of people were cheated of 6 crores in the name of 'NASA' | ‘नासा’च्या नावाने शेकडो लोकांना ६ कोटींचा गंडा

‘नासा’च्या नावाने शेकडो लोकांना ६ कोटींचा गंडा

Next

पुणे : अमेरिकेतील अंतराळ संशोधन ‘नासा’च्या नावाने अनेकांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रेडिओधर्मी दुर्लक्ष धातू राइस पुलर भाड्यांच्या उत्पादनात गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर परतावा मिळेल, असे आमिष दाखवून पुण्यात कोट्यवधींना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी राम गायकवाड (रा. माळेवाडी, अकलूज, सोलापूर), रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ (रा. कारखेल, पुणे) आणि राहुल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बाबासाहेब रामहरी सोनवणे (रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. राइस पुलर या नावाने देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे प्रकार आजवर उघडकीस आले आहेत़.

आरोपी यांनी संगनमत करून राइस पुलर धातूचे भांडे आपल्याकडे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्यांनी साधू वासवानी चौकाजवळील हॉटेल रिट्टस येथे लोकांचा मेळावा घेतला होता. यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर फायदा मिळेल, असे सांगितले़  त्यांना बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केला. त्यानंतर या लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

१०० तक्रार अर्ज पोलिसांकडे 
या प्रकरणात फसवणूक झालेल्या १००हून अधिक नागरिकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिले होते. आतापर्यंत पाच ते सहा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. आरोपींचा शोध घेतला जात असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक रुइकर यांनी सांगितले.

Web Title: Hundreds of people were cheated of 6 crores in the name of 'NASA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.