सिरसोत घरगुती वादातून झालेल्या हाणामारीत पती-पत्नीची हत्या; एक गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 07:52 PM2021-11-19T19:52:54+5:302021-11-19T19:53:37+5:30

Murder Case : या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन यात किशोर विठ्ठल गिरी वय वर्षे ४२ याचा घटनास्थळी तर त्यांची पत्नी दुर्गा किशोर गिरी (३८ ) हिचा अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला

Husband and wife murdered in Sirsot due to domestic dispute; One is serious | सिरसोत घरगुती वादातून झालेल्या हाणामारीत पती-पत्नीची हत्या; एक गंभीर

सिरसोत घरगुती वादातून झालेल्या हाणामारीत पती-पत्नीची हत्या; एक गंभीर

googlenewsNext

मूर्तिजापूर (जि. अकोला): सिरसो परिसरात राहत असलेल्या गिरी परीवारात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन यात किशोर विठ्ठल गिरी वय वर्षे ४२ याचा घटनास्थळी तर त्यांची पत्नी दुर्गा किशोर गिरी (३८ ) हिचा अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला . ही घटना १९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली या हाणामारीत एक महिला जण गंभीर जखमी झाली आहे. 
       

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सिरसो येथील सिरसो प्लॉट येथे राहत असलेल्या गिरी परीवारात अनेक दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन या हाणामारीत किशोर विठ्ठल गिरी (४२) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी दुर्गा किशोर गिरी वय वर्षे ३८ हिचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाला दुर्गा हिची आई जिजाबाई निरंजन गिरी ही यात गंभीररीत्या जखमी झाली. तिच्यावर अकोला येथे उपचार सुरु आहेत. 
       

दुपारी दोन्ही कुटुंबात शाब्दिक चकमक उडाली असता सैय्यद जाबीर, अर्चना गिरी, बेबी मोहन गिरी व ईश्वर पुरी यांनी उपरोक्त जखमींवर लोखंडी सब्बल व धारदार विळ्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात किशोर व दुर्गा याच्या डोक्यात लोखंडी सब्बलने व विळ्याने जोरदार वार करण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी शहर पोलीसांनी सैय्यद जाबीर, बेबी गिरी, अर्चना गिरी यांना ताब्यात घेतले असले तरी यातील मुख्य आरोपी ईश्वर याचा पोलीस शोध घेत आहेत. मृतकाचा मुलगा रोहन गिरी याने ग्रामीण पोलीसात फिर्याद दाखल केली आहे. वृत्त लिहिस्तोवर घटनेसंदर्भात ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास उपविभागीय अधिकारी संतोष राऊत  ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस करीत आहेत. विशेष म्हणजे गत ६ महिन्याच्या कालावधीत तालुक्यात ही दुहेरी हत्याकांडाची दुसरी घटना आहे.

Web Title: Husband and wife murdered in Sirsot due to domestic dispute; One is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.