पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:14 PM2019-04-04T17:14:28+5:302019-04-04T17:15:17+5:30
पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे...
पिंपरी : पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली आहे. रईस रफीक शेख (रा. शितोळे नगर, जुनी सांगवी) असे अटक आरोपीचे नाव आहे. रक्षदा रईस शेख (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी रक्षदा यांच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी यांची मुलगी रक्षदा लग्नानंतर सासरी राहत असताना तिचा पती रईस शेख हा पत्नीवर वारंवार संशय घेवून त्यांना दबावाखाली ठेवायचा. तसेच रक्षदा या आजारी पडल्यानंतर त्यांच्यावर कधीही उपचार करीत नव्हता. याउलट त्यांना मानसिक त्रास द्यायचा. रईस याच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून रक्षदा यांनी मंगळवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, याबाबत विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, रईस शेख याच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.