हल्लेखाेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; गोळी झाडून घेतल्याने प्रकृती चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 08:33 AM2022-02-14T08:33:20+5:302022-02-14T08:33:44+5:30

डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ राहणाऱ्या सोमनाथने ८ फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयातून पत्नी वंदनावर भररस्त्यात चाकूने वार केले होते.

Husband attempted suicide after assault; Sweeping the pill is worrisome | हल्लेखाेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; गोळी झाडून घेतल्याने प्रकृती चिंताजनक

हल्लेखाेर पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; गोळी झाडून घेतल्याने प्रकृती चिंताजनक

Next

डोंबिवली : पत्नीच्या चारित्र्यावर  संशय घेऊन भररस्त्यात तिच्यावर चाकूने वार करून पसार झालेला पती सोमनाथ देवकर (वय ४५) याने घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी सकाळी दत्तनगर येथे घडली. यात सोमनाथ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. 

डोंबिवली पूर्वेकडील दत्तनगर येथील गावदेवी मंदिराजवळ राहणाऱ्या सोमनाथने ८ फेब्रुवारीला चारित्र्याच्या संशयातून पत्नी वंदनावर भररस्त्यात चाकूने वार केले होते. यात वंदना गंभीर जखमी झाली. तर त्याने घटनेनंतर पोबारा केला होता. रामनगर पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, रविवारी सकाळी १० च्या सुमारास घरी आला. त्याच्याजवळील पिस्तुलाने स्वत:च्या छातीवर गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला आहे. हे समजताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले.

याआधीही हत्यार बाळगल्याचा गुन्हा
सोमनाथवर मारामारी आणि पिस्तूल बाळगल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  पत्नीवर वार करून तो नाशिक येथील जंगलात लपला होता. त्यानंतर रविवारी तो सकाळी घरी कोणीही नसताना आला आणि त्याच्याजवळील बेकायदेशीर पिस्तुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे पिस्तूल मध्यप्रदेश येथून आणले असल्याचे त्याने सांगितले. मात्र, ते कोणाकडून आणि कशासाठी आणले याचा तपास सुरू असल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली. सोमनाथ हा मासळी, भाजीविक्रीचा व्यवसाय करायचा तसेच खानावळीचीदेखील कामे करायचा, अशी माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Husband attempted suicide after assault; Sweeping the pill is worrisome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.