पतीकडून पत्नीला प्रेशर कुकरच्या झाकणाने मारहाण, प्रकरण पोलिसांत
By रूपेश हेळवे | Updated: March 24, 2023 16:58 IST2023-03-24T16:57:39+5:302023-03-24T16:58:03+5:30
फिर्यादी आयेशा यांना पती ओसिन यांचे नात्यातील महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता

पतीकडून पत्नीला प्रेशर कुकरच्या झाकणाने मारहाण, प्रकरण पोलिसांत
रुपेश हेळवे
सोलापूर : नातेवाईकासोबत प्रेमप्रकरणाचा संशय घेतल्याने पत्नीला पतीने प्रेशर कुकरच्या झाकणाने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी आयेशा ओसीन बागवान ( वय ३६, रा. संग्गम नगर, मुळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती ओसीन युसूफ बागवान याच्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी आयेशा यांना पती ओसिन यांचे नात्यातील महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचा संशय होता. यामुळे त्यांनी याबाबत विचारणा केल्यामुळे पतीने रागात येऊन पत्नीस लाथा बुक्क्यांनी मारहाण करत प्रेशर कुकरच्या झाकणाने छातीवर मारून जखमी केले. हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना २३ मार्च रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास संगमनगर मुळेगाव रोड सोलापूर येथे घडली. याप्रकरणी पत्नी आयशा बागवान यांच्या फिर्यादीवरून पती ओसिन बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.