Crime News: प्रॉपर्टी हडपण्यासाठी पती बनला हैवान, पत्नी आणि मुलांना घरात कोंडून लावली आग आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 04:28 PM2021-08-26T16:28:15+5:302021-08-26T16:32:23+5:30

Crime News: एका नराधमाने पत्नी घर नावावर करून देत नसल्याने पत्नी आणि दोन मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

Husband became a beast to grab property, wife and children were locked in the house and then Sets Fire | Crime News: प्रॉपर्टी हडपण्यासाठी पती बनला हैवान, पत्नी आणि मुलांना घरात कोंडून लावली आग आणि मग...

Crime News: प्रॉपर्टी हडपण्यासाठी पती बनला हैवान, पत्नी आणि मुलांना घरात कोंडून लावली आग आणि मग...

Next

पानीपत - हरियाणामधील पानिपत जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील राजनगर परिसरामध्ये एका नराधमाने पत्नी घर नावावर करून देत नसल्याने पत्नी आणि दोन मुलांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडित महिलेने आरडाओरडा केल्यावर शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिला आणि तिच्या मुलांना वाचवले. आता महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा पती आणि चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Husband became a beast to grab property, wife and children were locked in the house and then Sets Fire )

पोलिसांना दिलेल्या तक्रारीमध्ये पीडित महिलेने म्हटले आहे की, १५ माझा विवाह राजनगर येथे राहणाऱ्या प्रदीप ऊर्फ लंबू याच्याशी झाला होता. विवाहनंतर आम्हाला दोन मुले झाली होती. दरम्यान विवाहानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मला त्रास देण्यास सुरुवात केली, असा आरोप या महिलेने केला. तसेच नशेमध्ये पती मुलांनाही मारहाण करायचा. त्यानंतर मी माहेरून पाच लाख रुपये आणून पतीला दिले. त्यामधून त्याने  एक घर खरेदी केले. तसेच त्याची नोंदणी माझ्या नावावर केली. यावरून सासरची मंडळी माझ्यावर राग धरून होती.

दरम्यान, माझा पती सासू आणि वहिनीच्या सांगण्यावरून मला मारहाण करू लागला. तसेच घर नावावर करून देण्यासाठी दबाव आणू लागला. २१ऑगस्ट रोजी सकाली ७.३० वाजता मी रक्षाबंधनासाठी माहेरी जाण्याबाबत विचारणा केली. तेव्हा पतीने मला मारहाण केली. तसेच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या मुलांनाही खोलीत कोंडले. तसेच सामानाला आग लावली. तसेच तिघांनाही कापून टाकीन, अशी धमकी हातात चाकू देऊन करत होता. अस आरोपही पीडित महिलेने केला.

दरम्यान, पीडितेने आरडाओरडा केल्यार शेजाऱ्यांनी तिला वाचवले. मात्र तोपर्यंत घरातील सामान जळून गेले होते. त्यानंतर ही पीडिता कशीबशी माहेरी पोहोचली. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा पती प्रदीप, सासू सरिता, वहिनी ममत आणि पुतण्या विशाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Web Title: Husband became a beast to grab property, wife and children were locked in the house and then Sets Fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.