चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जिवंत जाळले, पत्नीची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 05:53 PM2020-01-03T17:53:29+5:302020-01-03T17:55:46+5:30

पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत.

Husband burnt to wife due to taken doubt of extra marital affair | चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जिवंत जाळले, पत्नीची मृत्यूशी झुंज

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जिवंत जाळले, पत्नीची मृत्यूशी झुंज

Next
ठळक मुद्दे दारूच्या नशेत मारहाण करून अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. 75 टक्के पेक्षा जळालेली सुमन ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.  पोलीस फरार आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर - शहरातील भारतनगरमध्ये राहणाऱ्या आत्माराम पवार याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेउन बुधवारी रात्री साडे बारा वाजता दारूच्या नशेत मारहाण करून अंगावर डिझेल टाकून पेटवून दिले. पत्नी सुमन 75 टक्के पेक्षा जास्त जळाली असून ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलीस फरार पती आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-4 येथील भारतनगरमध्ये राहणाऱ्या आत्माराम पवार(35) कुटुंबासह राहत होता. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी रात्री साडे बारा वाजता दारूच्या नशेत घरी आला. नेहमी प्रमाणे पत्नी सुमन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करू लागला. संतापलेल्या आत्माराम याने घरातील डिझेल पत्नी सुमन हिच्या अंगावर टाकून आग लावली. सुमन हिच्या अंगाला आग लागताच जीवनाच्या आकांताने सैरभैर पळू लागली. शेजाऱ्यांनी अंगावर पाणी टाकून जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. 75 टक्के पेक्षा जळालेली सुमन ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.  

सुरवातीला शहरातील मध्यवर्ती रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सुमन पवार हिची तब्येत बिघडल्याने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.  सुमन मृत्यूशी झुंज देत असून तिच्या जबानी नुसार विठ्ठलवाडी पोलीसानी पती आत्माराम पवार यांच्या विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकाराने भारतनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलीस फरार आत्माराम पवार यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Husband burnt to wife due to taken doubt of extra marital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.