पत्नीचा 'तो' अवतार पाहून पती हादरला; सुसाइड नोट लिहून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 07:42 AM2022-05-19T07:42:08+5:302022-05-19T07:42:19+5:30
कांदे बटाटे विक्री करून चंद्रदेव कुटुंबाचं पालनपोषण करत होता. १६ मे रोजी चंद्रदेवनं घरात गळफास घेत आत्महत्या केली
नालंदा – बिहारमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नालंदा परिसरात पतीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी सुसाइड नोट आढळली. ज्यात जे काही लिहिलं होतं ते ऐकून आसपासच्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे. पत्नीला आणण्यासाठी गेलेल्या पतीने तिला ज्या अवस्थेत पाहिले त्याने पतीच्या पायाखालची वाळू सरकली. हताश होऊन पतीने आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला.
मृत पतीने मरण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं की, जेव्हा घरातून निघून गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी मी पोहचलो. तेव्हा ती प्रियकराच्या मिठीत झोपली होती हे दिसलं. समोरील दृश्य पाहून मला धक्काच बसला. माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही. आता मी माझा जीव देत आहे असं सांगत त्याने घरातील पंख्याला लटकून गळफास घेतला. या घटनेमुळे आता २ चिमुकल्या मुलांवरील वडिलांच्या मायेचं छत्र हरपलं आहे.
नालंदाच्या लहेरी ठाणे हद्दीतील ही घटना आहे. याठिकाणी एका कॉलनीत चंद्रदेव कुमार राहत होते. २०१५ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. कांदे बटाटे विक्री करून चंद्रदेव कुटुंबाचं पालनपोषण करत होता. १६ मे रोजी चंद्रदेवनं घरात गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाशेजारी एक सुसाइड नोट आढळली. जी वाचून पोलीस हैराण झाले. पतीनं लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये पत्नीच्या अनैतिक संबंधाबद्दल उल्लेख करण्यात आला होता. सुसाइड नोटमध्ये पुढे म्हटलं होतं की, पत्नीचे तिच्या क्लासमेटशिवाय आणखी एका युवकाशी संबंध आहेत. पत्नीला मी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु मुले होऊनही ती प्रियकरासोबत राहू इच्छित होती.
८ मे रोजी पत्नी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली असता मी तिला परत आणण्यासाठी गेलो. तेव्हा ती प्रियकराच्या मिठीत झोपली होती. त्या आक्षेपार्ह दृश्याचा उल्लेख मी करू शकत नाही. त्यामुळे मला जगण्याची इच्छा नाही. मी माझा जीव देण्याचा निर्णय घेतला आहे असं त्याने मृत्यूपर्वी सांगितले. सध्या या प्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमोर्टम पाठवला असून रिपोर्ट आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. तर मृत व्यक्तीच्या भावाने आरोपी महिलेला अटक करण्याची मागणी केली आहे.