पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 05:27 PM2020-08-15T17:27:19+5:302020-08-15T17:34:21+5:30
पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहेरकोटदा पोलिसांनी ३२ वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अहमदाबाद - लग्न होऊन जवळपास दोन वर्षे झाली तरी पत्नी सेक्स करू देत नसल्याने निराश झालेल्या पतीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शाहेरकोटदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहेरकोटदा पोलिसांनी ३२ वर्षीय पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पत्नी गीता परमार ही जयंती वकील चाळीत राहते. सुरेंद्रसिंह याची आई मूली परमार (५५) यांनी ६ ऑगस्ट रोजी गीताविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुरेंद्रसिंहला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांनी गीतावर केला आहे. पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
शाहेरकोटदा पोलीस ठाण्यात सुरेंद्रसिंहच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, सुरेंद्रसिंह हा रेल्वेमध्ये काम करत होता. ऑक्टोबर २०१८ साली त्याचे गीतासोबत लग्न झाले होते. त्याआधी २०१६ मध्ये सुरेंद्रसिंहचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. तसेच दुसरीकडे गीताचा देखील घटस्फोट झाला होता. एकदा मी मुलाच्या खोलीत गेले होते. त्यावेळी मुलगा आणि सून दोघेही वेगवेगळ्या बेडवर झोपलेले होते. जेव्हा याबाबत मी मुलाला विचारले. त्यावेळी आमच्यामध्ये अजून कोणतेही शारिरीक संबंध झालेले नाहीत. गीता ही शारिरिक संबंध ठेवण्यास नकार देत असल्याचे त्याने आईला सांगितले. तिला कोणतेही संबंध त्याच्यासोबत ठेवायचे नव्हते, असा आरोप सुरेंद्रसिंहच्या आईने तक्रारीत केला आहे. अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
Sushant Singh Rajput Suicide : ईडीच्या हाती लागला पुरावा, आता होऊ शकते संदीप सिंगची चौकशी
Sushant Singh Rajput Suicide : संजय राऊत, मुंबई पोलीस आयुक्तांविरोधात तक्रार, पाटणा पोलिसांकडे अटकेची मागणी
सुशांतच्या कुटुंबीयांना शांत बसावं आणि मुंबई पोलिसांना सहकार्य करावं: संजय राऊत
डॉ.पायलच्या आत्महत्येतील संशयितांना इतर महाविद्यालयात प्रवेश नको
सुरज पांचोलीने सुशांत प्रकरणाची CBI चौकशीची मागणी केली अन् म्हणाला मैं दुआ करता हूं कि उनके परिवार को...
Video : देव तारी त्याला कोण मारी! कारने फरफटत नेऊनही महिला बचावली, रुग्णालयात उपचार सुरु
स्वातंत्र्यदिनी दिल्या जाणाऱ्या पोलीस पदके केंद्राकडून जाहीर