"१८ वर्षांत २५ वेळा घरातून पळून गेली पत्नी, आयुष्य उद्ध्वस्त केलं"; त्रासलेल्या पतीची तक्रार, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:16 IST2024-12-28T14:15:43+5:302024-12-28T14:16:11+5:30

पत्नीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप पतीने केला आहे.

husband complaint to sp his wife left home 25 times in 18 years | "१८ वर्षांत २५ वेळा घरातून पळून गेली पत्नी, आयुष्य उद्ध्वस्त केलं"; त्रासलेल्या पतीची तक्रार, म्हणाला...

फोटो - ABP News

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एका पतीने आपल्या पत्नीबाबत एसपीकडे तक्रार केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीने आपलं आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप पतीने केला आहे. त्यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली असून या वर्षांत ती २५ वेळा घरातून पळून गेली आहे. पती म्हणाला की, ती केव्हाही कुठेही निघून जाते आणि मी तिला शोधत राहतो. अनेकदा पोलिसांनी तिला शोधून परत आणलं आहे. एवढेच नाही तर तिने पतीविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.

हे प्रकरण बरेलीच्या किला पोलीस स्टेशनचं आहे जिथे मोहल्ला हुसैन बाग येथे राहणारा अफसर अली म्हणाला की, तो टॅक्सी चालवतो. २००६ मध्ये गुलाब नगरमध्ये राहणाऱ्या रुबी खानसोबत त्याचं लग्न झालं होतं. त्याला तीन मुलं आहेत. तिन्ही मुलं त्याच्यासोबत राहतात. अधिकाऱ्याने सांगितलं की, रुबीने लग्नानंतर घर सोडून जायला सुरुवात केली होती. छोट्या-छोट्या मुद्द्यावरून ती घराबाहेर जायची.

पतीने आरोप केला आहे की, २०१९ मध्ये देखील त्याची पत्नी घर सोडून गेली होती आणि पोलिसांच्या मदतीने तिला शोधून काढण्यात आलं. यानंतर ती आपल्या मुलीसोबत नोएडाला गेली. २०२३ मध्ये, मुलीने फोन केला आणि सांगितलं की तिच्या आईने तिला घरातून हाकलून दिलं आहे. त्यानंतर त्याने आपल्या मुलीला नोएडाहून घरी आणलं. एवढेच नाही तर पत्नीने त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे. घर, गाडी सगळं काही पत्नीच्या नावावर आहे.

अफसर अली म्हणाला की, पत्नी घरातून वारंवार पळून गेल्याने तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. इकडे तिकडे तिच्या शोधात तो आपल्या मुलांकडे लक्षही देऊ शकत नाही. त्याची सासूही पतीपासून वेगळी राहते आणि पत्नीच्या बहिणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने सांगितलं. तिच्या एका भावाने सहा लग्न केलं असून दुसऱ्या भावाची मानसिक स्थिती इतकी बिकट आहे, तो रस्त्यावर भटकत राहतो.
 

Web Title: husband complaint to sp his wife left home 25 times in 18 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.