मर्डर मिस्ट्री! विम्याच्या 1.90 कोटींसाठी पतीने काढला पत्नीचा काटा; असा रचला भयंकर कट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 08:54 AM2022-12-01T08:54:58+5:302022-12-01T09:02:04+5:30

पत्नी मंदिरात जात होती. पण याच दरम्यान एका SUV ने बाईकला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या चुलत भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

husband conspired get crores insurance murdered wife association history sheeter | मर्डर मिस्ट्री! विम्याच्या 1.90 कोटींसाठी पतीने काढला पत्नीचा काटा; असा रचला भयंकर कट

मर्डर मिस्ट्री! विम्याच्या 1.90 कोटींसाठी पतीने काढला पत्नीचा काटा; असा रचला भयंकर कट

googlenewsNext

राजस्थानच्या जयपूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. विम्याचे 1.90 कोटी मिळवण्यासाठी पतीने एक भयंकर कट रचला आहे. त्यानेच पत्नीचा काटा काढला. पतीने आपल्या पत्नीला मंदिरात पाठवलं आणि रस्त्यातच तिची हत्या केली. त्याने एका हिस्ट्रीशीटरला यासाठी सुपारी दिली होती. पाच ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेश चंद याने पाच ऑक्टोबरला आपली पत्नी शालू हिला तिचा चुलत भाऊ राजू याच्यासोबत बाईकने मंदिरात पाठवलं होतं. पत्नी मंदिरात जात होती. पण याच दरम्यान एका SUV ने बाईकला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर तिच्या चुलत भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांना सुरुवातीला हा अपघात असल्याचं वाटलं. पण जेव्हा त्यांनी चौकशी केली तेव्हा ते हैराण झाले. 

वंदिता राणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालू यांचा विमा काढण्यात आला होता. विमा कंपनीच्या नियमानुसार, नॅचरल मृत्यू झाल्यास एक कोटी आणि दुर्घटनेमध्ये मृत्यू झाल्यास 1.90 कोटी मिळणार होते, त्यामुळेच आरोपी महेश याने पत्नी शालूच्या हत्येचा कट रचला. हिस्ट्रीशीटर मुकेश सिंह याला सुपारी दिली. तसेच कामासाठी दहा लाख मगण्यात आले होते. महेशने त्याला त्याआधी 5.5 लाख रुपये दिले होते. 

2015 मध्ये महेश आणि शालू यांचं लग्न झालं होते. यांना एक बेटी आहे. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर त्यांच्यात वाद होऊ लागले. शालू आपल्या माहेरी राहू लागली. तसेच तिने महेश विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. पण काही दिवसांपूर्वीच महेशने शालूच्या नावाने विमा काढला होता. त्यानंतर पैशासाठी त्याने तिचा काटा काढला. ती मंदिरात जात असताना तिचा अपघात घ़डवून आणला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: husband conspired get crores insurance murdered wife association history sheeter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.