बापरे! जल्लाद पतीने पत्नीचे हात कुऱ्हाडीने कापले; द्यावी लागणार 3 कोटीची नुकसान भरपाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 16:33 IST2021-12-19T16:13:54+5:302021-12-19T16:33:05+5:30
Crime News : पतीने महिलेवर कुऱ्हाडीने 40 वार केले होते. मोठ्या कष्टाने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

बापरे! जल्लाद पतीने पत्नीचे हात कुऱ्हाडीने कापले; द्यावी लागणार 3 कोटीची नुकसान भरपाई
मॉस्को : कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलेला रशियासरकार भरपाई देणार आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेरशियाला पीडित महिलेला 3,70,000 युरो किंवा सुमारे 30 दशलक्ष रुपये म्हणजेच ३ कोटी रुपये देण्यास सांगितले आहे. वास्तविक, महिलेच्या जल्लाद पतीने कुऱ्हाडीने वार करून तिचे दोन्ही हात कापले होते. नंतर ऑपरेशनने एक हात जोडण्यात आला, परंतु दुसरा हात जोडण्यात डॉक्टरांना यश आले नाही. पतीने महिलेवर कुऱ्हाडीने 40 वार केले होते. मोठ्या कष्टाने तिचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
यामुळे पतीने हल्ला केल्याचे सांगितले
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, युरोपियन मानवाधिकार न्यायालयाने रशियाला २७ वर्षीय मार्गारिटा ग्रॅच्योवासह चार घरगुती हिंसाचार पीडितांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करावी लागली. डिसेंबर 2017 मध्ये, मार्गारीटाचा पती दिमित्री ग्रेचेव्ह याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. जल्लाद पतीने मार्गारीटा 40 वर कुऱ्हाडीने वार केले आणि तिचे दोन्ही हात कापले. खरं तर, पतीला संशय आला की आपल्या पत्नीचे दुसर्या व्यक्तीशी प्रेमसंबंध आहे, त्यामुळे त्याने इतक्या टोकाचा निर्णय घेतला.
पबच्या बाथरुममध्ये कपल झालं इंटिमेट, केलं खूप नुकसान; आकारला मोठा दंड
किळसवाणा प्रकार! १०० महिलांच्या मृतदेहांवर रुग्णालयातील इलेस्ट्रीशियनने केले बलात्कार
पोलिसांनी तक्रारीकडे लक्ष दिले नाही
दिमित्री ग्रॅच्योव्हला नंतर न्यायालयाने दोषी ठरवले आणि 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पीडितेने यापूर्वी पोलिसांना सांगितले होते की, तिचा पती तिला मारहाण करायचा, परंतु अधिकाऱ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. हे प्रकरण गांभीर्याने घेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियन सरकारला मार्गारिटा ग्रॅच्योव्हाला वैद्यकीय खर्च आणि मानसिक-शारीरिक आघातासाठी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच न्यायालयाने अन्य चार महिलांनाही नुकसान भरपाई देण्यास सांगितले आहे.
रशियाने यापूर्वीच नकार दिला आहे
न्यायालयाने रशियाला अशी प्रकरणे रोखण्यासाठी पुरेशी पावले उचलण्यास सांगितले आहे. याआधीही अशाच एका प्रकरणात रशियाने पीडितेला नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. घरगुती हिंसाचारासाठी सरकारला जबाबदार धरता येणार नाही, असे रशियन सरकारने म्हटले होते. त्याचवेळी, हिंसाचार पीडित महिलांची केस लढणाऱ्या वकील मारी दावतयान (Mari Davtyan)यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये सरकारच्या निष्क्रियतेमुळे प्रत्येक महिला गंभीर जखमी झाल्याचे लिहिले आहे.