जावयाचा अजब कारनामा, बायकोकडे परत मागितले हनीमूनला खर्च झालेले पैसे आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 11:01 AM2024-01-04T11:01:08+5:302024-01-04T11:03:46+5:30

लग्न 2022 ला रोहित नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. लग्नानंतर दोघे  हनीमूनला गेले. जिथे साधारण 10 लाख रूपये खर्च झाले.

Husband demands wife to pay back 10 lakh rs spent on honeymoon in Sahibabad | जावयाचा अजब कारनामा, बायकोकडे परत मागितले हनीमूनला खर्च झालेले पैसे आणि मग...

जावयाचा अजब कारनामा, बायकोकडे परत मागितले हनीमूनला खर्च झालेले पैसे आणि मग...

उत्तर प्रदेशच्या साहिबाबादमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आपल्या पतीसहीत सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेचा आरोप आहे की, लग्नानंतर ती आणि तिचा पती हनीमूनला गेले होते. ज्यासाठी साधारण 10 लाख रूपये खर्च झाले होते. आता पती तिच्याकडे हनीमूनसाठी खर्च झालेले पैसे परत मागत आहे. इतकंच नाही तर महिलेने सांगितलं की, पतीने तिला माहेरून पैसे आणण्यासही सांगितलं.

पीडितेचा आरोप आहे की, माहेरून पैसे आणले नाही म्हणून सासरी तिला त्रास दिला जात आहे. पतीने तिची थंड पाण्याने आंघोळ घातली. इतकंच नाही तर फ्रीजरमधील बर्फही तिच्या अंगावर टाकला. महिलेने पतीसहीत सासरच्या लोकांवर गर्भपात करण्याचा आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे.

पीडितेने आपल्या पतीसहीत एकूण 5 लोकांवर आरोप करत पोलिसात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. असं सांगण्यात आलं की, डिसेंबर 2022 मध्ये महिलेचं लग्न झालं होतं. लग्नात साधारण 60 लाख रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा महिलेने केला. 

पीडितेने सांगितलं की, तिचं लग्न 2022 ला रोहित नावाच्या व्यक्तीसोबत झालं होतं. लग्नानंतर दोघे  हनीमूनला गेले. जिथे साधारण 10 लाख रूपये खर्च झाले. हनीमूनवरून परत आल्यावर पतीने तिला खर्च झालेले पैसे परत मागितले. नकार दिला तर पतीसहीत सासरच्या लोकांनी तिला मारहाण केली. 

महिलेचा आरोप आहे की, तिचा गर्भपातही करण्यात आला आहे. सध्या पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे. 

Web Title: Husband demands wife to pay back 10 lakh rs spent on honeymoon in Sahibabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.