पतीने पत्नीवरच लावला रेपचा आरोप, लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाला धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 10:48 AM2023-04-12T10:48:39+5:302023-04-12T10:55:16+5:30

Gujarat : पतीने कोर्टात सांगितलं की, पत्नीने लग्न करताना तिच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून ठेवली होती. त्याशिवाय आम्हाला दोन मुलं आहेत. ज्यातील एक ना त्याचं आहे ना तिच्या पहिल्या पतीचं.

Husband file rape complain against wife in Gujarat | पतीने पत्नीवरच लावला रेपचा आरोप, लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाला धक्कादायक खुलासा

पतीने पत्नीवरच लावला रेपचा आरोप, लग्नाच्या 10 वर्षांनंतर झाला धक्कादायक खुलासा

googlenewsNext

Gujarat : गुजरातच्या सूरतमधून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे एका पतीने आपल्या पत्नीविरोधात रेपची तक्रार दाखल करण्यासाठी कोर्टात धाव घेतली आहे. सामान्यपणे अशा घटना ऐकायला मिळत नाहीत, अशात लोक या घटनेमुळे हैराण झाले आहेत. 

पतीने कोर्टात सांगितलं की, पत्नीने लग्न करताना तिच्या पहिल्या लग्नाची माहिती लपवून ठेवली होती. त्याशिवाय आम्हाला दोन मुलं आहेत. ज्यातील एक ना त्याचं आहे ना तिच्या पहिल्या पतीचं. ते मूल तिसऱ्याच व्यक्तीचं आहे.

10 वर्षाच्या लग्नात या दाम्पत्याला दोन मुले झाली होती. 10 वर्षानी पतीला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला तेव्हा त्याने दोन्ही मुलांची डीएनए टेस्ट केली. डीएनए टेस्टचा रिपोर्ट समोर आल्यावर त्याला चांगलाच धक्का बसला. रिपोर्टमधून खुलासा झाला की, दोनपैकी एक मूल ना त्याचं आहे ना महिलेच्या पहिल्या पतीचं आहे. ते मूल तिसऱ्याच व्यक्तीचं आहे.

या जोडप्याच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती. दोघेही आनंदाने संसार करत होते. एक दिवस पतीला पत्नीच्या फोनवर काही लोकांचं चॅटींग दिसलं. या चॅटवरून पतीला पत्नीवर संशय आला. यावरून दोघांमध्ये खूप वाद सुरू झाले. दोघांच्याही परिवारांनी त्यांचा संसार वाचवण्याचा प्रयत्न केला. पण काही झालं नाही. यादरम्यान पतीला समजलं की, पत्नीचं याआधीही एक लग्न झालं होतं आणि त्याच्यासोबत तिचं दुसरं लग्न आहे.

पत्नीच्या आधीच्या लग्नाबाबत समजल्यावर पती आणखी भडकला आणि त्याने आपल्या मुलांची डीएनए टेस्ट केली.  रिपोर्टमधून समोर आलं की, त्याच्या दोन मुलांपैकी एक ना त्याचं  आहे ना पत्नीच्या पहिल्या पतीचं. हे मुल तिसऱ्याच व्यक्तीचं आहे. यानंतर पतीने पत्नीविरोधात रेपची तक्रार करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही.

पोलिसांनी पतीची तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर पती मदतीसाठी कोर्टाकडे गेला. पतीच्या वकिलाने मीडियाला सांगितलं की, कोर्टाने पोलिसांना पत्नीविरोधात रेपचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.

Web Title: Husband file rape complain against wife in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.